yuva MAharashtra पंचशील नगर रेल्वे उड्डाणपूल कामाचा दैनंदिन वाहतुकीस अडथळा होणार नाही - जिल्हाधिकारी

पंचशील नगर रेल्वे उड्डाणपूल कामाचा दैनंदिन वाहतुकीस अडथळा होणार नाही - जिल्हाधिकारी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जुलै २०२४
सांगली शहरातून पश्चिमेकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना माधवनगर मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग असलेल्या पंचशील नगर रेल्वे गेट चे काम पूर्व नियोजन करून हाती घेण्यात आले आहे. याचा कोणताही त्रास या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना होणार नाही. असे प्रतिपादन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दया निधी यांनी केले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, यावेळी डॉ. दयानिधी बोलत होते. या कामाची दैनंदिन माहिती वैयक्तिक पातळीवर मी घेईन असे सांगून डॉ. दया नदी म्हणाले की माझ्याकडून वैयक्तिकरित्या या कामावर लक्ष दिले जाईल आणि वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, पंचशील नगर रेल्वे गेटच्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आधीच खूप मनस्ताप होतो आहे. चिंचोळा असणाऱ्या या मार्गावरील रेल्वे गेट बंद असताना, एक एक किलोमीटरच्या दुचाकी धारकांच्या रांगा लागतात. गेट उघडल्यानंतर येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. अशातच रेल्वे गेट जवळील अर्धा अधिक भाग उड्डाणपुलासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच मनस्ताप सहन करणाऱ्या प्रवाशांना, मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 

वास्तविक माधवनगर मार्गावरील कलानगर येथील रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरच पंचशील नगर उड्डाणपुलाचे काम सुरू करावयास हवे होते. परंतु रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या भावनेची कदर न करता, कलानगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अर्धवट असतानाही, जुना बुधवार रोडवरील पंचशील नगर उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. याबाबत विविध संघटनांनी, कलानगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पंचशील नगर रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम हाती घेऊ नये, असे निवेदन दिले होते. परंतु या निवेदनांना केराची टोपली दाखवून कोणाच्यातरी हट्टाने हे काम हाती घेतल्याचा आरोप होत आहे.