Sangli Samachar

The Janshakti News

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता महायुतीकडून पिंक ई-रिक्षाचा आधार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
गत लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश संपादन न करता आगामी विधानसभा निवडणुकीच्या लक्ष डोळ्यासमोर ठेवून महायुतीने शिंदे सरकारच्या माध्यमातून महिला मतदारांवर विविध योजनांचे जाळे फेकत आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. यापूर्वीच्या लोकप्रिय योजनेनंतर आता शिंदे सरकार 'पिंक ई-रिक्षा योजने'च्या माध्यमातून नव्याने महिला मतदारांना आकर्षित करण्याचे ठरविले आहे.

पूर्वी मर्यादित असलेली ही योजना आता लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव ३ टक्के निधीतून
जिल्हा व तालुका स्तरापर्यंत करण्यात येईल. यामधून प्रत्येक जिल्ह्यात ५०० पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले आहे.


पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांना आकर्षित करणे तसे सोपे. आणि म्हणूनच अशा योजनांच्या माध्यमातून विधानसभेतील विजयाचे गणित मांडले जात आहे. आणि विरोधकांच्या भाषेत सांगायचे झाले तर, 'तीन पैयेवाले सरकार' सत्तेत आणण्याचे मनसुबे आखले जात आहेत.

आता महिला मतदार महायुतीच्या या खेळीला म्हणतात आणि विधानसभा निवडणुकीत आपले बळ त्यांच्या पाठीशी उभे करतात, हे विधानसभेच्या निकालानंतरच समोर येऊ शकेल.