| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
गेली काही वर्षे जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावून, नंतर ऑगस्ट जुलै च्या दरम्यान पावसाचे उपस्थिती दमदार होत आहे. परंतु यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर आता मान्सून सक्रिय होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली असून पाणलोट क्षेत्रातही पावसाचा मुक्काम सुरू आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, जिल्ह्यात पावसाला अनुकूल वातावरण आहे. मान्सूनची ही सुरुवात शेतकऱ्यांना सुखावणारी होती. शेतीसह, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त असून, पुढील आठवड्यावर याचा मुक्काम असाच आनंददायी राहणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाण्यामुळे आगामी काही काळ चिंता मिटवणारी आहे.
पुढील दहा दिवसांतील पावसाचा अंदाज (मिलिमीटरमध्ये)
मिरज तालुका
सांगली शहर - 100 ते 111 कवठेपिरान, दुधगाव - 90 ते 100
मिरज शहर- 90 ते 100 अंकली, इनामधामणी - 100 ते 110
भोसे, मालगाव, म्हैसाळ, आरग परिसर - 80 ते 90
बेळंकी, सलगरे - 60 ते 70
शिराळा तालुका
चांदोली धरण परिसर - 600 ते 650
शेडगेवाडी परिसर - 340 ते 360
कोकरुड - 370 ते 390
शिराळा शहर - 200 ते 210
वाळवा तालुका
इस्लामपूर शहर परिसर - 120 ते 140
नेर्ले - 140 ते 150
वाळवा - 130 ते 140
बहादूरवाडी - 150 ते 160
पलूस तालुका
पलूस शहर व कुंडल - 100 ते 110
कडेगाव तालुका
कडेगाव परिसर 100 ते 120
चिंचणी अंबक - 100 ते 120
वांगी - 90 ते 100
विटा शहर, खंबाळे - 80 ते 90
खानापूर शहर - 50 ते 60
तासगाव तालुका
तासगाव शहर 90 ते 100
विसापूर परिसर - 90 ते 100
कवठेएकंद - 80 ते 90
सावर्डे - 70 ते 80
आटपाडी, दिघंची - 30 ते 40
कवठेमहांकाळ तालुका
देशिंग, कुची, नागज परिसर - 40 ते 60
जत तालुका
जत शहर - बिळूर, संख, उटगी, उमदी परिसर - 30 ते 40 मि.मी.