yuva MAharashtra सूर्यकुमारच्याच्या कॅचने नव्हे, ऋषभ पंतच्या या कृतीने विश्वचषकातील सामना भारताने फिरवला !

सूर्यकुमारच्याच्या कॅचने नव्हे, ऋषभ पंतच्या या कृतीने विश्वचषकातील सामना भारताने फिरवला !


| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. २ जुलै २०२४
टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारताने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्याचे श्रेय सर्वच खेळाडूंना जाते. परंतु या सामन्यात सूर्यकुमारने बॉर्डर लाईनवर घेतलेला अप्रतिम कॅच सामन्याचा टर्निंग पॉईंट मानला जातो. परंतु खरी गेम वेगळीच आहे. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आपल्या खिशात घातलेला सामना भारताने मोठ्या शेताफिने आपल्याकडे खेचून घेतला.

दक्षिण आफ्रिकेने बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध १७७ धावांचा यशस्वी पाठलाग करीत असताना हेनरिक क्लासेन तुफान फटकेबाजी करत असल्याने सामना अधिक रोमहर्षक झाला. पण हार्दिक त्याला बाद केल्याने भारताच्या विजयाची शक्यता वाढली. पण तत्त्पूर्वी मैदानात अशी एक घटना घडली, ज्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले.

अखेरच्या ४२ चेंडूंमध्ये ६८ धावांची गरज असताना आफ्रिकेच्या आशा पूर्णपणे हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरवर अवलंबून होत्या. मिलरने कुलदीप यादवला लागोपाठ चौकार लगावले तर अक्षर पटेलच्या स्पेलमधील शेवटच्या षटकात क्लासेनने २४ धावा केल्या, समीकरण ३० चेंडूत ३० धावांवर येऊन पोहोचले. सामन्यावर वर्चस्व असलेला भारतीय संघ यानंतर दबावाखाली आला होता. अगदी विजयाचा अंदाजही दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने होता आणि त्यांना विजयाची जवळपास ९० टक्के संधी होती. पण १७व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद केल्याने भारताने पुनरागमन केले. बुमराहने दोन किफायतशीर षटकेही टाकली आणि सामना पुन्हा भारताच्या हातात आला.

बुमराहच्या तिसऱ्या षटकानंतर, जेव्हा दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ षटकांमध्ये २६ धावांची गरज होती आणि क्लासेन आपल्या विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत होता. तेव्हा पंतने मेडिकल टाइम-आउट घेतला. फिजिओ त्याच्या गुडघ्याभोवती पट्टी गुंडाळण्यासाठी मैदानावर आला. यामुळे सामना सुरू व्हायला काही मिनिटांचा वेळ गेला आणि यादरम्यान कर्णधार आणि इतर खेळाडूंनी रणनिती आखली तसेच आफ्रिकेच्या फलंदाजांच्या फॉर्मवरही याचा परिणाम झाला. हे पाहताच भारत सामना स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शास्त्री यांनी सांगितले,. 'भारतीय संघ जे शक्य आहे ते सर्व करत आहे, अगदी सामना स्लो डाऊन करण्याचा प्रयत्नही करत आहेत जेणेकरून ते या दोन स्फोटक फलंदाजांची लय तोडू शकतील.' आणि खरंच हीच कृती दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने अंतिम सामन्यात वरून महाराष्ट्रात विजय मिळवला व टी ट्रेन ते सांगण्याच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले.