yuva MAharashtra फडणवीस-देशमुख यांच्या वादाने तापलेल्या वातावरणाची समित कदम यांना झळ !

फडणवीस-देशमुख यांच्या वादाने तापलेल्या वातावरणाची समित कदम यांना झळ !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज वादाला तोंड फुटते आहे. गेले दोन दिवस आणि देशमुख यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आणि या तापलेल्या वातावरणाची झळ जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना बसत आहे. 

अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या विरोधात आरोप करणारे, ॲफिडेव्हिट द्यावे असा निरोप यांनी दिला होता. समित कदम आपल्याकडे या संदर्भात पाच ते सहा वेळा आला असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधात आरोप काय करायचे त्याचा लिफाफा समितनं दिल्याचं देशमुख आणि सांगितलं होतं. समित सोबतच्या संवादाची व्हिडिओ क्लिप सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.


या आरोपाचा इन्कार करीत समित कदम म्हणाले, मी स्वतःहून अनिल देशमुख यांना कधीच भेटायला गेलो नव्हतो, तर देशमुख यांनीच मला भेटायला बोलावलं होतं. त्यामध्ये फडणवीस यांचा कोणताही संबंध नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पहा, अशी विनंती आपल्याला अनिल देशमुख यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपण देशमुख यांची भेट घेतली नव्हती, उलट देशमुखांनीच आपल्याला बोलवल्यानंतर आपण तेथे गेलो होतो असा खुलासा कदम यांनी केला आहे.

शंभर कोटींच्या वसुलीच्या रूपात काही तथ्य नसल्याचे आपण समित कदमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कळवले आणि नेत्यांविरोधात आरोप करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतरच आपल्यावर दुसऱ्या दिवशी ईडीने छापेमारी केले आणि खोट्या गुन्ह्यात गुंतवले. या प्रकरणात आपल्याला 13 महिने तुरुंगात राहावं लागल्याचंही देशमुख यांनी म्हटले आहे.