Sangli Samachar

The Janshakti News

पेट्रोल दरवाढीला कंटाळला आहात ? ई बाईक बाबत शंका आहे ? मग तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
वाढते पेट्रोल दर ही सध्या सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरलेले आहे. यावर पर्याय म्हणून ई बाईक आली. परंतु त्याच्या बॅटरीबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. पहिलं म्हणजे ही बाईक दूरवरच्या प्रवासासाठी उपयोगाचे नाही. कारण बॅटरी चार्ज केल्यानंतर ती जास्तीत जास्त शंभर किलोमीटर धावते. पुढं काय ? हा प्रश्न असतो. दुसरा बॅटरीची किंमत. या बॅटरीची लाईफ विक्रेते पाच ते सात वर्षे सांगत असले तरी एका माहितीनुसार बॅटरी तीन वर्षे चांगला परफॉर्मन्स देते. त्यानंतर ती बदलावे लागते. आणि तिची किंमत पन्नास हजाराच्या घरात असल्यामुळे, याचे गणित पेट्रोलच्या बाईक इतकेच येते. आणि हीच खरी ग्राहकांची समस्या आहे.

पण आता तुमच्यासाठी खास बातमी आहे. बजाजने तुमची ही अडचण लक्षात घेऊन बहुचर्चित सीएनजी बाईक मार्केटमध्ये आली आहे. पेट्रोल आणि ई बाईकच्या तुलनेत या नवीन सीएनजी बाईकची किंमत सर्वसामान्यांना परवडल्या कितपतच आहे. चला तर मग जाणून घेऊ या नवीन सीएनजी बाईकबाबत...

या सीएनजी बाईक चे नाव बजाज फ्रीडम 125 असे असून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बजा भारतीय संचालक राजीव बजाज यांच्या हस्ते पुणे येथे ही लॉन्च करण्यात आली. या नवीन मॉडेलमध्ये तीन पर्याय उपलब्ध असून ज्यामध्ये पेट्रोल तसेच सीएनजी साठी दोन स्वतंत्र स्विचेस आहेत. ही एक पेट्रोल आणि दुसरी सीएनजी साठी अशी ट्विन टॅक सेटअपसह सुसज्ज असून केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सीएनजी वर चालणारी ही पहिली मोटर सायकल आहे.

बजाज फ्रीडम १२५ मध्ये १२५ सीसी सिंगल-सिलिंडर इंजिन असेल. जे पेट्रोल आणि CNG अशा दोन्हीवर चालू शकते. हे ९.५ पीएस कमाल पॉवर आणि ९.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे मॉडेल ३०० किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

फ्रीडम १२५ तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. NG04 Disc LED, NG04 Drum LED आणि NG04 Drum. एलईडी व्हेरिएंट पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत आणि नॉन-एलईडी ड्रम व्हेरिएंट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

या बाईकमध्ये सेगमेंटमधील सर्वात लांब सीट (785MM) दिली आहे; जी समोरील इंधन टाकीला खूपच जास्त प्रमाणात कव्हर करते. या सीटखाली सीएनजी टाकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये हिरवा रंग CNG आणि नारंगी रंग पेट्रोल दर्शवते. असे बजाज ऑटोचे म्हणणे आहे. कंपनीचे पुढे असा दावा केला आहे की या बाईकने ११ वेगवेगळ्या चाचण्या पास केल्या आहेत; ज्यामुळे ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

रिपोर्ट असे सांगतात की बजाज फ्रीडम १२५ ही २१३ किलोमीटर प्रति किलो CNG मायलेज देते. ज्यामुळे तो प्रवाशांसाठी अत्यंत कार्यक्षम पर्याय आहे.