yuva MAharashtra राज्यातील जातीपातीचं विष समूळ नष्ट कर रे बा विठ्ठला; राज ठाकरे यांचा धावा !

राज्यातील जातीपातीचं विष समूळ नष्ट कर रे बा विठ्ठला; राज ठाकरे यांचा धावा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जुलै २०२४
आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशाच्या विविध भागातून पंढरीत अनेक भाविक दाखल होतात. विठ्ठलाच्या चरणी आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे गात, त्या दूर करण्याची विठोबाला साद घालतात. यामध्ये राजकीय पक्षाचे नेतेही आघाडीवर असतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा ही यामध्ये भरणा असतो. त्यांनी मागितले गाऱ्हाणे विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळते, आणि तो चर्चेचा विषय बनतो.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे नेहमीच अशा चर्चेत आघाडीवर असतात, मग मुंबईतील मुंब्रा देवी किंवा सिद्धिविनायकाला राज्यातील जनतेची संकट मुक्त करण्याचे विनंती असो, जेव्हा मग नुकतेच पंढरीच्या विठुरायाला घातलेली साद.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज एकादशीचे औचित्य साधत विठू माऊलीच्या चरणी 'महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंघ सह्याद्री दिसू दे !' अशी प्रार्थना केली आहे.

X या समाज माध्यमावरुन राज ठाकरे यांनी विठू माऊलीच्या चरणी हे गाऱ्हाणे पोहोचवले आहे. आता विठू माऊली X समाज माध्यमावर लक्ष ठेवून असते का ? ती राज ठाकरे यांची पोस्ट वाचेल का ? असा प्रश्न कोणी विचारला ? तर तो राजद्रोह ठरण्याची शक्यता आहे बरं का ?