| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जुलै २०२४
महायुतीतील शिंदे गटाचे मंत्री अर्जुन खोतकर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ खरा मानायचा झाला तर, 'लाडक्या बहिणीला फसवण्याचा उद्योग' सुरू असल्याचा आरोपही समाज माध्यमावरून केला जात आहे.
कथित व्हिडिओमध्ये अर्जुन खोतकर हे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे की, इथून गेल्यानंतर लगेच मतदार याद्या काढा, महिलांची नावे शोधून काढा. आणि उद्याच्या उद्या... थोडा पॉज घेऊन यामध्ये पुढं म्हटलं आहे, "काय नाटक करायला लागंल यादी तयार करण्याचं... तुम्ही आधार कार्ड द्या, तुम्ही पॅन कार्ड द्या"... इथेच हा व्हिडिओ थांबतो.
आणि एक नवा आवाज याबाबत म्हणतो, "योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, योजनांसाठी कागदपत्र तयार करण्याचा तुम्ही फक्त नाटकच करा." असं ते सहजपणे सांगून गेले. याचा अर्थ ही योजना राबवण्यात महायुती सरकारला कोणताही रस नाही, हे फक्त मतांचा पाऊस पडण्यासाठी डाव रचला जातोय. यातून स्पष्ट होतंय. मात्र राज्यातील महिलांची दिशाभूल करणाऱ्या महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईलच."
आता या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर महायुतीतील नेते मंडळी काय आणि कशी सारवासारव करतात, ये लवकरच दिसून येईल.