| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जुलै २०२४
जुलै महिना उजाडला की, 2019 चा महापूर आठवून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या उरात धडकी भरते. सध्या शहरी भागात पावसाने असली तरी, धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. हवामान अंदाजानुसार यंदा मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असल्याने, सांगली कोल्हापूर भागातील नाद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येऊ शकतो.
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्यात पाणी पातळीचे नियम पाळले जात नाहीत. यावर सांगली व कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंतांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे. परंतु हे सर्वच अधिकारी अजूनही बेफिकीर असल्यामुळे संभावित महापुराने पुन्हा एकदा नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मला पार्श्वभूमीवर मागील अनुभव लक्षात घेता, येत्या दीड दोन महिन्यात संभावित पावसामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा पुन्हा एकदा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे जर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जीवित व वित्तहानी झाली तर त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जबाबदार धरण्यात यावे अशी नोटीस कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक कृती समिती सांगली व आंदोलन अंकुश शिरोळ यांच्या वतीने शासनास देण्यात आली आहे.