| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १८ जुलै २०२४
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण, वयोश्री योजना अंमलात आणल्यानंतर लाडक्या भावाकडे दुर्लक्ष का ? असा सवाल विरोधकांकडून व समाजातून होत होता. त्यामुळे वरील योजना नंतर एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री भाऊ योजना' सुरू करण्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे बोलताना केली.
महाराष्ट्र शासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारचे योजना आणलेली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की तरुण कारखान्यात काम करीत असताना सरकार त्यांना अप्रेंटिसशिप साठी स्टाय पण देईल यातून बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, तर डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये, तसेच पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. याचा विद्यार्थ्यांच्या मनोबलावर चांगला परिणाम होणार असून, वर्षभर अप्रेंटिसशिप करण्यासाठी हे पैसे देण्यात येणार आहेत यामुळे त्याला कामाचाही अनुभव मिळेल त्या जोरावर त्याला चांगली नोकरी ही प्राप्त होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आमच्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात कुशल तरुणांची संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त करून एकनाथ शिंदे म्हणाले की महायुती सरकार हे गरिबांचे सरकार आहे लाडक्या बहिणीसह भाऊ देखील लाडके साहेब असेही त्यांनी विरोधकांना उत्तर देताना म्हटले आहे.