yuva MAharashtra विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट टीमवर आधी कौतुकांचा आणि नंतर पैशाचा पाऊस !

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट टीमवर आधी कौतुकांचा आणि नंतर पैशाचा पाऊस !


| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. १ जुलै २०२४
टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल अकरा वर्षांनी आयसीसी ट्रॉफी चा दुष्काळ संपवला. या विजयानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाला भरघोस बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.

शनिवारी 29 जून रोजी केन्सिंग्टन ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यातील ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या याच खात्यावर ही घोषणा केली. 


जय शाह यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की आयसीसी पुरुष टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल टीम इंडिया साठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा, दृढनिषय आणि खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ चे अभिनंदन !