yuva MAharashtra शंभर फुटी रस्त्यावरील खड्डा जुन्या ड्रेनेज लाईनमुळे, महापालिकेत चा खुलासा !

शंभर फुटी रस्त्यावरील खड्डा जुन्या ड्रेनेज लाईनमुळे, महापालिकेत चा खुलासा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
काल शंभर फुटी रोड दिगंबर मेडिकल शॉप च्या समोर खड्डा पडल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी ड्रेनेजची लाईन आहे, सदरची लाईन ही 14 ते 15 फूट खोलीची आहे. खड्डा पडल्यानंतर पुढील व मागील बाजूच्या चेंबर चेक केला असता, पुढील बाजूच्या चेंबर मध्ये गाळ व बारीक दगडे दिसून आलेली आहेत. तर खड्ड्याच्या मागील बाजूचा चेंबर पूर्णपणे भरलेला दिसून येत आहे. असा खुलासा महापालिका पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.


सदर ड्रेनेजची लाईन 700 एम एम डायमीटरची 24 वर्षांपूर्वीची असून, सततच्या वापराने व पाईप मधील गॅसमुळे खराब झाली आहे. त्यामुळे रस्त्याला भगदाड पडले आहे. सदर कामाची ड्रेनेज विभागाकडील अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून व लाईनबाबतची पूर्णपणे माहिती घेतल्यानंतर, वार्षिक एजन्सी धारकाकडून सदर लाईन चेक करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही सुनील पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे.