yuva MAharashtra विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यात 'कॅमलिन'ला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या सुभाष दांडेकर यांचे दुःखद निधन

विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यात 'कॅमलिन'ला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या सुभाष दांडेकर यांचे दुःखद निधन


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ जुलै २०२४
वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे पाहण्याऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावे असं स्वप्न पुराशी बाळगून 1931 वेधशाळेत, आणि महापालिकेत काम करणाऱ्या उच्च शिक्षित दांडेकर बंधूंनी सुखासीन सरकारी नोकरी सोडून, स्वतःचा उद्योग आणि तेही शाई बनवण्याचा. हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देणाऱ्या अशा या जिद्दी सुभाष दांडेकर यांचं काल सकाळी सातच्या सुमारास मुंबईत दुःखद निधन झालं.

एकेकाळी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शालेय साहित्य मध्ये कॅमलिनचे कंपास आणि रंग पेटीच असायची. खरंतर विद्यार्थ्यांचे आयुष्य रंगीबेरंगी करणारे हे उद्योजक, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खोडरबर पासून ते विविध कार्यालयांना लागणाऱ्या स्टेशनरी पर्यंत सगळ्याच गोष्टी त्यांनी बनवल्या. ' उंटाच्या पाठीवर काडी ठेवली, आणि उंट खाली बसला' अशा अर्थाची एक इंग्रजीमध्ये म्हण आहे. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचा कधीच ओझं नाही. उलट त्याला जगभरात मानाचं पान मिळवून दिलं आणि हजारो कुटुंबांना उत्पन्नाचा साधनही. पुढे या क्षेत्रात अनेक कंपन्या आल्या पण त्या मुलींच्या उत्पादनामध्ये जी एक सौंदर्यदृष्टी होती ती मात्र कुठल्याच उत्पादनामध्ये दिसून आले असं म्हणणं धाडसाचं ठरेल.


जागतिकीकरणाच्या भोकात कॅमलिनचा मोठा हिसा 'कोकुयो' या जापनीस कंपनीने घेतला. पण जे मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले, ज्याची दखल जगाने घेतली. त्यामध्ये 'कॅमलिन'चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. कॅमलिन या ब्रँडच्या प्रवासाने किंवा उंटाची नाममुद्रा घेऊन जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशात पोहोचलेल्या या मराठी उद्योजकाची, उद्योगात गगन भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणाने घ्यायला हवी.