| सांगली समाचार वृत्त |
हैद्राबाद - दि. १८ जुलै २०२४
हिमानी नवरत्न तेल, बोरोप्लस अँटी सेप्टीक क्रिम, बोरोप्लस प्रिंकली हीट पावडर, हिमानी निरोगी दंत मंजन लाल, सोना चांदी च्यवनप्राश याबाबतची एक प्रकारची सुनावणी तेलंगणा उच्च न्यायालयात सुरू आहे. वरील प्रॉडक्ट कॉस्मेटिक आहेत की ड्रग ? यावरून राज्य सरकार आणि वरील कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे. आणि हाच वादाचा तेलंगणाच्या कोर्टातील डायस वर पोहोचला आहे.
न्या. कोशे आणि न्या. एम तुकाराम जी या द्विसदस्य खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की हिमानी निरोगी दंतमंजनला आपण कॉस्मेटिक म्हणून संबोधू शकतो. परंतु सोना चांदी चवनप्राश, नवरत्न हेअर ऑईल, गोल्ड टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम, बोरोप्लस अँटिसेप्टिक क्रीम, बोरो प्लस प्रिंकली हिट पावडर हे ड्रज म्हणजेच औषध विभागात गणले जात असल्याचा स्पष्ट उल्लेख तेलंगणा हायकोर्टातील वरील न्यायमूर्तींनी दिला आहे.
आंध्रप्रदेश जनरल सेल्स टॅक्स ( एपीजीएसटी) कायदा 1957 अंतर्गत ही सर्व उत्पादने कॉस्मेटिक आहेत की ड्रग्ज याबाबत वाद सुरू होता. सेल्स टॅक्स अपिलेट ट्रिब्यूलंट (एसटीएटी) आणि हिमानी लिमिटेड यांच्यामध्ये करा संदर्भातील दोन्ही बाजूकडून प्रकरण ताणले गेल्याने, हा वाद तेलंगणा उच्च न्यायालयात पोहोचला. यातील वादी प्रतिवादीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील प्रमाणे निकाल न्या. कोशे आणि न्या. एम तुकाराम जी यांनी दिला आहे.