yuva MAharashtra प्रथम भुजबळ आणि त्यानंतर सुनेत्राताई शरद पवारांच्या भेटीला; राज्यात बिघडतंय-घडतंय !

प्रथम भुजबळ आणि त्यानंतर सुनेत्राताई शरद पवारांच्या भेटीला; राज्यात बिघडतंय-घडतंय !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १७ जुलै २०२४
'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.' याची प्रचिती वारंवार येत असते. विशेषतः शरद पवार यांच्याबाबत हे वाक्य चफकल असते. आपल्या राजकीय सोयीसाठी त्यांना कोणताच राजकीय पक्ष किंवा राजकीय व्यक्तीचे वावडे नाही असे म्हटले जाते. ते कधी कोणाला जवळ करतील आणि कधी कोणाला दूर करतील याची माहिती त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाही नसते.


मध्यंतरी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी सावता सुभा मांडीत भाजपशी संसार थाटला. यासाठी अजित पवार यांनी अर्धे अधिक राष्ट्रवादी आपल्याबरोबर नेली. त्यानंतर शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्देगिरीचे हातातून निसटलेला डाव नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या बाजूने वळवला. यादरम्यान बारामती त्यांनी लेकीसाठी आपल्या सुनेविरुद्ध डावपेच खेळले.

यादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे नव्या डावपेचांना सुरुवात झाली असून, महाआघाडी आणि महायुतीत नाराजांना आपल्या गोटात ओढण्याची चडाओढ दिसून येत आहे.

या साऱ्या राजकीय हालचालीत केंद्रस्थानी आहेत ते एकाकी पडलेले अजित पवार. भाजपात त्यांना 'घेतले' की ते 'स्वतः गेले' अशी चर्चा वर्षभर सुरू होती. त्याचबरोबर तेथे त्यांचे आणि त्यांच्या सेनापतींचे घुसमट होत असल्याचे अनेकदा दिसून आले. परंतु राजकीय सोय म्हणून अजित पवार यांनी भाजपा नेत्याशी जुळवून घेण्याची भूमिका स्वीकारली. प्रसंगी लोकसभेत कमी जागा घ्याव्या लागल्या.

मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी रणशिंग फुंकले असून, एकीकडे शरद पवार यांच्याशी जुळवून घेत, दुसरीकडे तिसरी आघाडी उघडण्याची शक्यता अजित पवार चाचपून पाहत आहेत. यासाठी आपल्या शिलेदारांना त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी गाठीभेटी घडविण्याचा घाट घाटला आहे. याचाच एक भाग म्हणजे, नुकतीच छगन भुजबळ यांनी घेतलेली शरद पवार यांचे भेट.

छगन भुजबळ-शरद पवार यांच्या भेटीबाबत फारसे कोणाला काही वाटले नाही. कारण त्याला मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुलामा चढवला गेला होता. परंतु जेव्हा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पुण्यातील शरद पवार यांच्या मोतीबाग निवासस्थानी पोहोचल्या, तेव्हा राजकारण्यांसह, सर्वसामान्यांच्याही भुवया उंचावल्या. ही भेट 'राजकीय की कौटुंबिक' याबाबत शासन करता असली तरी, सौ. सुनीता पवारांच्या तेथील दीड तासांच्या उपस्थितीत नेमके काय 'शिजले' ? याची प्रचिती आगामी काळात त सर्वांनाच दिसून येणार आहे.