Sangli Samachar

The Janshakti News

काखेत कळसा गावाला वळसा, छत्रपतींची खरी वाघनखं साताऱ्यातच !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जुलै २०२४
प्रत्येक महाराष्ट्रवासीयांच्या हृदयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान वादातीत आहे. इतिहासातील त्यांचे प्रत्येक पान हे अंगावर रोमांच उभा करणारं... अफजलखानाचा वध आणि त्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखं हा समर प्रसंग कुणीही विसरू शकणार नाही. आणि सध्या याच वाघ नखावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. कारण, कोट्यावधींचा खर्च करून लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं ही खरी नसल्याच्या इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे गदारोळ माजला आहे.

इंद्रजीत सावंत यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत केलेल्या पत्र व्यवहारांमध्ये म्युझियम प्रशासनाने वाघ नख अफजलखानाच्या वधावेळचीच असल्याचा कोणताही निश्चित पुरावा नसल्याचे म्हटलं आहे.


मग प्रश्न निर्माण होतो की, ती खरी वागणकर आहेत तरी कुठे ? तर इंद्रजीत सावंत यांनी असा धावा केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ती अस्सल वाघनखन साताऱ्यातच असून 1945 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पुस्तकात ती वाघ नखं छत्रपतींच्या घराण्यातील जल मंदिरमध्ये देवघरात ठेवण्यात आली होती असा दावाही इंग्रजीत सावंत यांनी केला आहे.

राजकारण करायचं तर करा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर शिवप्रेमींच्या भावनांशी खेळू नका असा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आता विरोधकाने युती सरकारला धारेवर धरला असून, महाराष्ट्रातील करदात्यांनी प्रामाणिकपणे भरलेला कर वाया घालवला असल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या वादामुळे विरोधकांना हा इथे खोलीतच हाती सापडला आहे.