| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
भारतीय संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिकेला नमून वर्ल्डकप वर आपले नाव कोरले. याबद्दल सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीसमोर लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाला की भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकून जगात एक वेगळी ओळख निर्माण केले आहे. हा वर्ल्ड कप मिळाल्यामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीला मोठा आनंद झाला आहे. याचाच एक भाग म्हणून हास काँग्रेस पक्षाच्या वतीने लाडू वाटप करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.
यावेळी सांगली महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक फिरोज पठाण, प्रकाश मुळके संतोष पाटील, अजितराव सूर्यवंशी, यांच्यासह कय्युम पटवेगार, हाजी तौफिक बिडीवाले, अमोल झांबरे, प्रत्येक राजमाने, मयूर बांगर, अवधूत गवळी, अमित भांदिगिरे, राहुल साळुंखे, आयुष मोरे, जुनेद महात, श्वेतल गवळी आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षातर्फे वाटण्यात आलेल्या लाडू वाटपाचा या मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी आनंद घेतला.