| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जुलै २०२४
सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पावसाने हाहा:कार उडवून दिला. अनेक पाण्याखाली गेल्यामुळे बस वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी सांगली जिल्ह्यातील दहा हजार ओतून विविध भागात धावणाऱ्या 825 बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यातून एसटी महामंडळाला दहा लाख 33 हजार 136 रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
आगारनिहाय रद्द फेऱ्या व आर्थिक नुकसान
आगार - रद्द फेऱ्या - बुडालेले उत्पन्न
सांगली - २२६ - १,७५, ११०
मिरज - १६४ - १,९३,६६६
विटा - ६४ - १,११,१,०९
इस्लामपूर - १२० - २,२८,३५९
तासगाव - १८ - २६,०२६
क.महांकाळ - ५५ - ९४,९१६
शिराळा - ९८ - ९७,५६७
पलूस - ७२ - ७२,४७८
४४६५१ किलोमीटरच्या फेऱ्या रद्द
जिल्ह्यातील सर्व दहा आगारांमधून ४४ हजार ६५१ किलोमीटरपर्यंतच्या ८२५ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यात सर्वाधिक इस्लामपूरमधून १० हजार ८२० किलोमीटरपर्यंतच्या फेऱ्या रद्द केल्या गेल्या.