Sangli Samachar

The Janshakti News

कर्मवीर पतसंस्थेच्या 63 व्या कागल शाखेचे ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
कागल - दि. ८ जुलै २०२४
कर्मवीर पतसंस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदीपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशी आहे. त्यामुळे सभासदांचा चांगला विश्वास या संस्थेने प्राप्त केलेला आहे हे संस्थेच्या प्रगतीवरून दिसते. कर्मवीर पतसंस्थेने सहकारातील अनेक मान्यवरांची शाब्बासकी मिळवलेली आहे. यावरूनच संस्थेच्या कार्याची माहिती होते, असे गौरवोगार महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी काढले. त्यांच्या हस्ते संस्थेच्या कागल येथील 63 व्या शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुश्रीफ बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती आणि कर्मवीर भाऊराव अण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली. फित कापून ना. मुश्रीफ यांनी शाखा कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील हे होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्था सभासदांना देत असलेल्या सेवा सुविधांची माहिती, उपस्थित कागलवास यांना करून दिली. संस्था सेवा रुपाने कागलवासियांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वासही त्यांनी आपल्या स्वागतामध्ये व्यक्त केला. संस्थेच्या ठेवीत रमरु. 1110 कोटी असून संस्थेने रूप 805 कोटींचे कर्ज वितरण केले आहे. संस्था सभासदांना सर्व ऑनलाईन सेवा देत आहे. संस्थेचा स्वनिधी १०७ कोटींचा असून गुंतवणूक ररु. 388 कोटी आहेत. संस्थेचा मिश्र व्यवसाय सुरू 2000 कोटींकडे वाटचाल करीत आहे. संस्थेची सभासद संख्या 65000 असल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली. संस्थेच्या सर्व सभासदांच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न घेऊन संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत असल्यामुळे सभासदांनी संस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. संस्थेने सभासद ठेवीदार कर्जदार सेवक या सर्वांची काळजी संचालक मंडळ घेत आहे हे श्री रावसाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.


कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. आ. वीरकुमार पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्था एवढी मोठी झाल्याचा खूप आनंद आहे. आता संस्थेने आपले कार्यक्षेत्र वाढवून कर्नाटकामध्ये आपला शाखा विस्तार करावा, अशी भावना बोलून दाखवली सभासदांना सातत्याने उच्चांक लाभांश देणारी कर्मवीर पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांनी संस्थेच्या कार्याचे विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमास निवृत्त पोलीस अधिकारी सतीश माने, सामाजिक कार्यकर्ते श्री अमित पिष्टे, अमित अजित अथणे, धन्यकुमार सुभाष पाटील, उद्योजक सागर माने, रमाकांत घोडके आदींची उपस्थिती होती.

शाखेचे नूतन सल्लागार श्री सुरज अजित अथणे, आनंदराव घाडगे, महेश अभय चौगुले, विजयकुमार महावीर पाटील, मनोज श्रीकांत व्हराटे, रत्नदीप सुधाकर चौगुले यांचा यावेळी ना. मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. तर शाखाधिकारी किरण महावीर चौगुले व विभागीय अधिकारी अभिजीत जिनगोंडा खोत यांना प्रमुख पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास संस्थेचे संचालक ॲड. एस पी मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, ए. के. चौगुले, (नाना) वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, चेतन आप्पासाहेब पाटील, डॉ. एस. बी. पाटील (मोटके) संचारिका भारती आप्पासाहेब चोपडे, सौ चंदन नरेंद्र केटकाळे, लालासो भाऊसो थोटे आदी उपस्थित होते. शेवटी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक अण्णा सकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन संजय सासणे यांनी केले.