yuva MAharashtra घड्याळासह राष्ट्रवादी कोणाची ? सुप्रीम निर्णय 6 ऑगस्टपर्यंत लांबणीवर !

घड्याळासह राष्ट्रवादी कोणाची ? सुप्रीम निर्णय 6 ऑगस्टपर्यंत लांबणीवर !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ जुलै २०२४
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिल्यामुळे या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. काल झालेल्या सुनावणी मध्ये कोर्टाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्हाबाबत दोन आठवड्यात आपले उत्तर सादर करावे असे आदेश दिले आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाला याबाबत आक्षेप किंवा त्यांचे काही म्हणणे असेल तर एक आठवड्यात सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.


सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाची बाजू ॲड. मनुसिंगवी यांनी मांडली. यावेळी त्यांनी अजित पवार गटाकडून गेल्या दोन-तीन महिन्यापासून उत्तर सादर केले नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांना आपले म्हणणे दोन आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्या. आता सुनावणीचे पुढील काम सहा ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे घड्याळ शरद पवारांच्या की अजित पवार गटाच्या हाती मानले जाणार याचा निर्णय होणार आहे.