Sangli Samachar

The Janshakti News

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी, एकाचा मृत्यू !


| सांगली समाचार वृत्त |
जगन्नाथपुरी - दि. ८ जुलै २०२४
हाथरस येतील चेंगराचेंगरीचा प्रकार ताजा असतानाच, आता ओडिसा येथील पुरी येथून जगन्नाथाचा रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर येत असून, यामध्ये 400 हून अधिक भाविक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

दरवर्षी ओडिसामधील जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेचा मोठा सोहळा असतो. यापूर्वी अनेक वेळा अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्यानंतरही  
दुर्घटनेपेक्षा श्रद्धा मोठे असल्याने, भाविक यातून काहीच बोध घ्यायला तयार होत नाहीत. याचाच प्रत्यय अनेक धार्मिक स्थळावरून येत असतो. 


जगन्नाथ पुरी येथील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ दुखापत झालेल्या भाविकांना उपचारानंतर घरी जाण्यास परवानगी देण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भगवान जगन्नाथाचा नंदीघोश रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर काही भाविकांमध्ये बाचाबाचे झाल्याने अचानक चेंगराचेंगरीस सुरुवात झाले यामध्ये 400 गुण अधिक भाविक खाली पडले व जखमी झाले यात एका भाविकाचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला आहे, हा भाव एक ओडिशा बाहेरचा असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अद्याप त्याचे ओळख पटलेली नाही दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुरीमध्ये 53 वर्षानंतर भगवान जगन्नाथाची रथयात्रा दोन दिवसाची संपन्न होत आहे. 1971 पासून ही रथयात्रा एक दिवसाची होत होते मात्र यंदा ते दोन दिवसाचे करण्यात आले आहे प्रतिवर्षी होणाऱ्या या रथयात्रेत मोठ्या संख्येने भाग एक सहभागी होत असतात. प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत असूनही भाविकांचा उत्साह इतका मोठा असतो की वारंवार अशा चेंगराचेंगरी च्या घटना घडत असतात. त्यामुळे भाविकांनी जगन्नाथाचा रथाची दोरी ओढत असताना, आपल्या आयुष्याच्या दोरीचे काळजी घेण्याचे आवश्यकता व्यक्त होत आहे.