| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जुलै २०२४
एकीकडे छानछोकी आयुष्य जगत असताना दुसरीकडे याचा मानवाला धोका निर्माण होत आहे. वायुप्रदूषण हे यापैकी एक. वाढते शहरीकरण, आणि रस्त्यावर होणारे वाहनांची गर्दी हे याला कारणीभूत ठरत आहे. या सर्वांचा परिणाम वायू प्रदूषणावर होत असून देशात तब्बल 33 हजार मृत्यू हे याच वायू प्रदूषणामुळे होत आहेत.
पायाभूत सुविधांची वाणवा, नागरी वसाहती व कारखाने, वाढती वाहन संख्या यामुळे शहरातील हिरवळ कमी होत चालली आहे. याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे. कारखान्यांपेक्षा रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणाचा आणि मानवाचा श्वास कोंडतो आहे. एकट्या राजधानीत 11. 5% म्हणजेच तब्बल 12000 मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत. देशाचा विचार करावयाचा झालास दहा शहरांमधील जवळपास सात टक्के मृत्यू हे या वायु प्रदूषणाचे कारण ठरत आहेत.
'लॅसेट प्लॅनेटरी हेल्थ' मधील अहवालानुसार भारतातील दिल्ली पाठोपाठ कोलकत्ता, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी, शिमला, आणि आपल्या महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या शहरांचा नंबर लागतो. या अहवालानुसार वरील दहा शहरात पीएम 2. 5 चे प्रमाण सर्वात जास्त आढळलेले आहे जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेबाबत जी मर्यादा आखून दिली आहे त्यापेक्षा हे प्रमाण जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.
वायु प्रदूषणामुळे दिल्लीत 12000, मुंबईत दरवर्षी 5100, कोलकत्यात 4700, चेन्नईत 2900 बंगळुरू मध्ये 2100, मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.