| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जुलै २०२४
कृष्णा नदीचा महापूर अंगणात उभा आहे, तो सांगलीकरांची परीक्षा पाहतोय. त्याचवेळी यापुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचे कार्यकर्तेही उभे ठाकले आहेत. त्यांच्यासोबत 25 टेम्पो चार बस आणि स्वयंसेवकांचे मोठी टीम आहे. सांगलीकरांसाठी 2019 व 2021 नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून आले आहेत.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी पातळी 40 ft वरून अधिक होणार असल्याने या स्थितीत नदीच्या काठावरील लोकांचे स्थलांतर सुरू झाले असून, त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे निशुल्क टेम्पो सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये साहित्य भरण्यासाठी ही मदतीची टीम उपलब्ध आहे. पृथ्वीराज पाटील हे स्वतः मदत कार्यात पुढाकार घेत असून असं देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. भर पावसात ते पूरपट्ट्यात उभे ठाकले आहेत. त्यांच्यासोबत सौ. विजया पाटील आणि सुपुत्र वीरेंद्र पाटील हेही मैदानात उतरले आहेत.
शहरातील कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काका नगर, पसायदान कॉलनी, शिवशंभो चौक इत्यादी भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन इतरेजण करीत असताना, पृथ्वीराज पाटील हे मात्र केवळ सल्ला न देता, जातीने मदतीसाठी पुढे आले आहेत. या वर्गातील पूरग्रस्तांचे केवळ साहित्यच नव्हे, तर नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एका बसची सोय करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, कृष्णेचे पाणी सातत्याने वाढत असताना, सर्वच पक्षातील लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, नागरिकांच्या स्थलांतरासाठी पुढे यावे अशी स्थिती आहे. संकटाशी एकजुटीने, राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे. पावसाने थोडी वसंत दिली असली तरी धोका अध्यापक टळलेला नाही. त्यामुळे सर्वांनीच डोळ्यात तेल घालून सावध राहण्याचे आवश्यकता आहे.
पूरग्रस्तांच्या सहाय्यर्थ पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सोबत प्रमोद सूर्यवंशी, बिपिन कदम, सनी धोत्रे, विशाल हिप्परकर, आयुब निशानदार,, प्रशांत ऐवळे, अल्ताफ पेंढारी, प्रशांत देशमुख, समीर मुजावर, आशिष चौधरी, शितल सदलगे, संतोष भोसले, सतीश जगदाळे, अरबाज शेख, योगेश राणे आदि कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.