yuva MAharashtra सांगलीचे आमदार कामगिरी दमदार, बामनोळी येथील सभामंडपासाठी दिला 21 लाखाचा निधी !

सांगलीचे आमदार कामगिरी दमदार, बामनोळी येथील सभामंडपासाठी दिला 21 लाखाचा निधी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जुलै २०२४
सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामांचा डोंगर उभा केला असून, सातत्याने विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील बामनोळी गावांमधील दत्तनगरमध्ये असलेल्या खुल्या जागेत सभामंडप बांधण्यासाठी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.


या कामाच्या उद्घाटन प्रसंगी बामनोळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख पै सुभाषअण्णा चिंचकर यांनी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून त्यांचे आभार मानले. यावेळी पै. सुभाषअण्णा चिंचकर, बामनोळीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. गीताताई सुभाष चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य राजेश सन्नोळी, यांच्यासह अन्य सदस्य, पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे सर, तंटामुक्ती अध्यक्ष सुमित यमगर आदी मान्यवरांसह बामनोळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.