Sangli Samachar

The Janshakti News

रोहित विराट नंतर 'या' आक्रमक खेळाडूची टी 20 मधून निवृत्ती !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ जुलै २०२४
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आपल्या भात्यातील एकाहून एक भेदक गोलंदाजांनी घाम फोडणारा, तसेच तळपत्या बॅटने समोरील गोलंदाजाची भांबेरी उडवणारा आक्रमक खेळाडू म्हणून अजय जडेजा याचा नावलौकिक आहे. जडेजा याने गोलंदाजी असो व फलंदाजी अनेक वेळेला अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला बाहेर काढले आहे. माजी कप्तान आणि अशाच घातक कामगिरीने सुपरिचित असलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याने जडेजाला 'सर' हे पदवी दिली होती.


रोहित शर्मा आणि विराट कोहली या सलामीच्या जोडीनंतर क्रिकेट संघाला सावरणाऱ्या संकटमोचक अजय जडेजाने निवृत्ती घेतल्याने, क्रिकेट प्रेमीमध्ये हा चर्चेचा विषय बनलेला आहे. या त्रिमूर्तीने घेतलेल्या निर्णयामुळे टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये यापुढे भारतीय संघाची कामगिरी नव्या फळीतील तरुण क्रिकेटपटूवर असणार आहे. ती कशी असेल याचे उत्तर येणारा काळच देईल. पण या त्रिमूर्तीची उणीव मात्र भासणार असल्याची चर्चा क्रिकेट प्रेमीमध्ये सुरू झाली आहे.