yuva MAharashtra घरफोड्याला अटक करून तब्बल 17 लाखांचा ऐवज जप्त, सांगली पोलिसांची कारवाई !

घरफोड्याला अटक करून तब्बल 17 लाखांचा ऐवज जप्त, सांगली पोलिसांची कारवाई !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जुलै २०२४
दिवसाढवळ्या बंद घरे आणि फ्लॅट लुटणाऱ्या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 16 लाख 66 हजाराचे सोन्या चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. मंगेश येताळा भारते (वय 27, रा. माधळमुठी, ता. खानापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सांगली येथील लोकल बोर्ड कॉलनीत पकडून त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

सांगलीतील सराईत गुन्हेगार बबलू सिंग टाक आणि संगत सिंग कल्याणी (रा. दोघेही पुणे) यांनी विविध ठिकाणी चोऱ्या करून लुटलेले दागिने भरते याच्याकडे विक्रीकरिता दिले होते, असे त्याने कबूल केले आहे, असे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

सांगलीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या बंद घरे, फ्लॅट फोडून चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे, पोलिसांवर चोहूबाजूने टीका होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी पोलिसाला घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. यामध्ये शहरासह ग्रामीण भागात भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान वर्धन यांना काही चोरट्यांचा शोधावा लागला होता. त्या आधारे तपास केला जात असतानाच संशयीत मंगेश भारती हा लोकल बोर्ड कॉलनी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्री नायक माहिती खबऱ्या कडून मिळाली. पोलिसांनी सापळा रुचून संशयित भारते याला त्याच्याकडील दुचाकीसह ताब्यात घेतले, यावेळी तपास केला असता वरील प्रमाणे दागिने सापडले. हे दागिने बबलू सिंग टाक आणि संगतसिंग कल्याणी या दोघांनी आपल्याकडे विक्रीसाठी दिल्याची कबुली त्याने दिली तसेच सांगलीतील घनश्याम नगरमध्ये वरद विश्व अपार्टमेंटमधील दिनांक 19 जुलै रोजी फ्लॅट लुटल्याची कबुली भारते याने यावेळी दिली. याबाबत नितीन संभाजी पाटील यांनी संजय नगर पोलिसात चोरीची फिर्याद दिली होती.


भारते याच्याकडून पोलिसांनी 16 लाख 66 हजारांचे 2४५ ग्रामचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. यामध्ये बोरमाळ, गंठण, मंगळसूत्र, चेन, कर्णफुले, रिंगा, ब्रेसलेट, वेढण, बदाम, झुबे अशा दागिन्यांचा समावेश आहे तर अडीच हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि सुमारे 75 हजार रुपये किमतीची दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे संशयित भारते यांच्या चौकशीत संजय नगर पोलीस ठाण्याकडील दोन, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील दोन आणि विटा पोलीस ठाणे कडील एक असे पाच गुन्हे उघड केस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निरीक्षक वर्धन, उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे, हनुमंत लोहार, प्रकाश पाटील, संकेत मगदूम, दरीब बंडगर, सागर लवटे, अमोल ऐवळे, अरुण पाटील, सोमनाथ गुंडे, अजय बेंद्रे सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.