| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ६ जुलै २०२४
ओडिसा राज्यातून गांजाची तस्करी करीत तासगाव तालुक्यात विक्री आणणा-या आंतरराज्य टोळीच्या मुस्क्या आवळत, या टोळीकडून 34 किलो 505 ग्रॅम गांजा, देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे, मोटार सायकल, एक चार साठी गाडी असा तेरा लाख 99 हजार 35 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तासगाव पोलिस आणि दबंग कामगिरी केली आहे. याप्रकरणी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील चार जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती देताना सचिन थोरबोले म्हणाले की, ओडीसा राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी व विक्री होत आहे याप्रकरणी ठीक ठिकाणी पोलीस कारवाई करीत आहेत. काल अटक केलेल्या टोळक्याकडून आपण हा गांजा ओडिसा राज्यातून आणत असल्याचे सांगण्यात आले. तसेच हा गांजा आपण तासगाव तालुक्यात विक्री करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले की, गोपनीय सूत्राकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांना याबाबत टीप मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव भिवघाट रोडवर बेरडवाडी फाट्याजवळ सापळा लावला होता. यावेळी मनोज संभाजी नागणे, (वय 36, रा. महूद बुद्रुक, ता. सांगोला जिल्हा सोलापूर) हा रस्त्याकडेला मोटार सायकलवर पिशवीत गुहांच्या घेऊन थांबण्याचे दिसून आले त्याच्याकडून चार किलो दहा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
मागणे याच्याकडून पोलीस कोठडीत तपासा दरम्यान आपल्या मित्राच्या घरी महोद बुद्रुक येथे आठ किलो गांजा ठेवल्याची माहिती दिली. हा गांजा ही पोलिसांनी नंतर जप्त केला.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर मागणे याने हा गांजा ज्ञानेश्वर महादेव काळे (रा. नरसिंगपूर, ता इंदापूर, जि पुणे) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर काळे याला महूद बुद्रुक येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर वैष्णव नाना लावंड (रा. नरसिंगपूर, ता इंदापूर, जि पुणे) याच्यासह भागीदारीमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले.
तासगाव तालुक्यातील पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.