| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जुलै २०२४
प. पु. आचार्य श्री 108 सुयशगुप्तजी महाराज यांचा समृद्ध पावन चातुर्मास सांगली गावभाग येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये होणार आहे. सदर चातुर्मास कार्यक्रम सकल जैन सांगली यांचे मार्फत करण्याचे आयोजिले आहे.
दिनांक 14-7-2024 ते दिनांक 19-7-2024 या कालावधीमध्ये श्री बृहदगणधर वलय विधान आणि संगीतमय श्री महावीर कथा यांचे आयोजन केले आहे. सदर विधान हे तरुण भारत मंडळ हॉल येथे प. पु. आचार्य श्री 108 यांच्या सानिध्यात संपन्न होणार आहे.
तसेच दिनांक 22-7-2024 रोजी जैनेश्वरी दीक्षा कार्यक्रम आणि वर्षायोग स्थापना होणार आहे. जैनेश्वरी दीक्षा कार्यक्रमांमध्ये दीक्षार्थी ब्र. सुशीला जैन (सप्तम प्रतिमाधारी) आणि दीक्षार्थी ब्र. संध्या जैन यांना प. पु. सुयशगुप्तजी महाराज यांचे कडून दीक्षा देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा रॉयल पॅलेस, हरिपूर रोड सांगली, येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व जैन श्रावक आणि श्राविका यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहून धार्मिक ज्ञानार्जन करावे.
चातुर्मासाचा मुख्य उद्देश हा तरुण पिढीला धर्माची आवड निर्माण व्हावी, त्यांनी एकत्र यावे, त्यांचा काही वेळ मंदिरासाठी, आपल्या धर्मासाठी सत्कारणी लागावा हा आहे. सदर चातुर्मासाचे नियोजन सकल दिगंबर जैन समाज गाव भाग सांगली, श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर गाव भाग, तसेच जैन युवा संघटना गावभाग सांगली आणि सहेली ग्रुप गावभाग जैन मंदिर यांच्यामार्फत केले आहे. अशी माहिती अध्यक्ष श्री सुरेश (दादा) पाटील व जैन युवा संघटना अध्यक्ष श्री आदित्य आवटी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.