| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जून २०२४
तीर्थकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज, सांगली या महाविदयालयास सन २०२४-२५ पासून संशोधन केंद्रास (Ph.D) शिवाजी विदयापीठाकडून मान्यता मिळाली आहे. हे महाविदयालय सन २०१६-१७ पासुन सुरू असून डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसी (फार्मास्युटीक्स, फार्मास्युटीकल केमिस्टी, फार्माकोलॉजी) हे अभ्यासक्रम सुरू आहेत.
सदर महाविदयालयामध्ये समाजपयोगी संशोधनाचे काम यशस्वी रित्या चालू असून अल्पावधीतच फार्मसी क्षेत्रातील अग्रगण्य महाविदयालय म्हणून नावलौकिक मिळवला आहे. एम. फार्मसीच्या विदयार्थ्यांनी रिलझोल हे मेंदूच्या दुर्धर आजारावरील महागडे औषध अत्यंत नगण्य खर्चात व नोंद असलेल्या वेळेपेक्षा कमी कालावधीमध्ये यशस्वीरित्या बनवले आहे. तसेच याठिकाणी मधुमेह व मेंदू विकारावरच्या संशोधनासाठी वेगवेगळी उपकरणे विदयार्थ्यांच्या सहभागातून तयार करून त्यांची परिक्षणे सुरू आहेत. मधुमेह व मेंदूविकार संशोधनाबाबत महाराष्ट्रात अग्रेसर बनण्याचे उद्दिष्ट ठेवून यशस्वी वाटचाल करत आहे.
यावेळी संशोधन केंद्रासाठी विशेष करून प्रयत्न केलेले कॉलेजचे संस्थापक प्रा. डी.डी. चौगुले सर आणि प्राचार्य किरण वाडकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील व सचिव श्री. अजित पाटील यांनी केला तसेच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचा सत्कार श्री महावीर चौगुले यांनी केला भिलवडी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब चोपडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रा. डी.डी. चौगुले यांनी केला यावेळी संस्थेचे संचालक, श्री. मिलिंद भिलवडे, श्री. प्रशांत अवधुत, श्री. नितिन चौगुले, व श्री. सुर्दशन शिरोटे उपस्थित होते