| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जून २०२४
महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरात घडली आहे. देशात लोकसभा निवडणूक निकालाची तयारी सुरु असताना मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला.
मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलींने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणाचे सचिव तसेच वरिष्ठ आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलगी लिपी रस्तोगी हीने इमारतीवरुन आज (3 जून) पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केल्याचे समजत आहे. रस्तोगी हे 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅरडचे आयएएस अधिकारी आहेत.
लिपी रस्तोगी ही 27 वर्षांची होती. मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीत रस्तोगी कुटुंब राहत आहे. जिथे हा प्रकार घडला तिथे सुसाइड नोट सापडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार, लिपी रस्तोगी ही वकिलीचं शिक्षण घेत होती. शैक्षणिक कामगिरीच्या चिंतेत ती होती असं सांगितले जात आहे.