| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. १२ जून २०२४
आपल्या देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहता आता भारतीय बाजारपेठेमध्ये सीएनजी कार तसेच इलेक्ट्रिक बाइक्सना मोठी मागणी आली आहे. तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, देशाची सर्वात मोठी दुचाकी उत्पादक ऑटो कंपनी बजाज भारतीय बाजारपेठेमध्ये मोठा धमाका करत पहिली सीएनजी बाईक लॉन्च करणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बजाज भारतीय बाजारपेठेमध्ये 17 जुलै 2024 रोजी पहिली सीएनजी बाईक लॉन्च करू शकतो. यापूर्वी कंपनी 18 जून 2024 ला ही बाईक लॉन्च करणार होती मात्र आता 17 जुलै ही बाईक लॉन्च होणार असल्याची चर्चा बाजारात सुरू झाली आहे. भारतीय बाजारात लॉन्च होण्यापूर्वी कंपनीकडून या बाईकची सर्व टेस्टिंग करण्यात येत आहे. अशी माहिती बजाजचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी दिली आहे.
फिचर्स काय असणार ?
मिळालेल्या माहितीनुसार कंपनीकडून या बाईकमध्ये, राऊंडडेट एलईडी हेडलाईट, लहान साइड व्ह्यू मिरर, झाकलेली सीएनजी टाकी, लांब सिंगल सीट, हँड गार्ड, अलॉय व्हील्स, फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल स्पीडोमीटर सारखी फिचर्स देण्यात येणार आहे. तसेच एकापेक्षा जास्त व्हेरियंटमध्ये ही बाईक लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये ही बाईक लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप किमती जाहीर करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, देशाची सर्वात मोठी दुचाकी उत्पादक ऑटो कंपनी बजाज भारतीय बाजारपेठेमध्ये मोठा धमाका करत पहिली सीएनजी बाईक लॉन्च करणार आहे.