yuva MAharashtra शरद काकांपाठोपाठ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी करणार "पंढरीची वारी" !

शरद काकांपाठोपाठ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी करणार "पंढरीची वारी" !


सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ जून २०२४
अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्या असलेलं पंढरपूरचा विठोबा दर्शन हे तसं एरव्हीही अनेकांसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. तशात आषाढी पंढरपूर वारी ही तर विठू भक्तांच्या वारकऱ्यांसाठी प्रत्यक्ष स्वर्ग सुखावून कमी नसतो. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पालख्या व दिंड्या पंढरपूरसाठी निघत असतात. इथं या वारीच्या दरम्यान ना जात भेद असतो. ना लिंगभेद असतो, ना वयोभेद... त्यामुळे आनंद घेण्यासाठी अनेक लोक आसुसलेले असतात...

मागील आठवड्यात राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार यांनी आपण या वारकऱ्यांना सोबत करणार असल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. आता वयाचा विचार करता, ते किती किलोमीटर चालले महत्त्व याला नाही. वारकऱ्यांशी संवाद ही यातली महत्त्वाची गोष्ट. शरद पवार यांच्या पाठोपाठ आता लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, राहुल गांधी यांनीही वारीत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे, त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय बनलेला आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच ते केवळ वारकऱ्यांशी संवाद साधणार की संपूर्ण वारी पूर्ण करणार याची माहिती मात्र अद्याप उपलब्ध झालेली नाही.


मध्यंतरी राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने शेकडो किलोमीटर पायपीट केली होती. त्यामुळे ही वारी पूर्ण करणे त्यांच्यासाठी तसे फारसे अवघड नाही. पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना नसला तरी, वारकऱ्यांना याचा त्रास होण्याचा मुद्दा, विरोधकाकडून पुढे केला जाऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी ही वारी करणार असल्याचा मुद्दा आत्ताच व्हायरल होतो आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वारीच्या वेळी काय आणि कसा अनुभव येतो हे येणारा काळच ठरवेल. परंतु सध्या तरी " वारकऱ्यांच्या वेषातील राहुल बाबांचा पंढरीची वारी" हा मुद्दा मीडियासाठी टीआरपी ठरत आहे.