| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० जून २०२४
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा तर्फे महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सत्कार केला. वसंतदादांनी स्थापन केलेली ही संस्था महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थेची मातृसंस्था आहे. यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे आर. एस. चोपडे सर व रजपूत सर, तसेच डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेज तर्फे प्राचार्य डी. डी. चौगुले सर यांनी त्यांचा सत्कार केला, तर दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाच्या वतीने डॉक्टर अजित पाटील, अजित भंडे, प्रशांत अवधूत यांनी सत्कार केला.
अल्पसंख्यांक दर्जा पुनः प्रस्थापित करण्यासाठी माजी खासदार प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नामुळे जैन अल्पसंख्यांक दर्जा पुन्हा बहाल करण्यात आला असे डॉक्टर अजित पाटील म्हणाले, यावेळी गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ॲड. उत्तमराव निकम, सतीश सारडा, प्रमोद शेटे, संजय चौधरी यांनी सत्कार केला. कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमार्फत ॲड. एस.पी. मगदूम, डॉक्टर अशोक सकळे, वसंतराव नवले, ए.के. (नाना) चौगुले, डॉक्टर नरेंद्र खाडे, श्रीमती भारती चोपडे, जनरल मॅनेजर अनिल मगदूम यांनी सत्कार केला. केमिस्ट संघटना, स्वदेशी ट्रस्ट, बिल्डर असोसिएशन तर्फे, रवींद्र वळवडे, सागर पाटील, अजित प्रसाद पाटील, सचिन संकपाळ, हर्षद पाटील, सुयश वळवडे विपुल पाटील, मिलिंद भिलवडे, यांनी सत्कार केला यावेळी सर्व संस्थांना भेट देण्याचे अभिवचन खासदार विशाल पाटील यांनी दिले....