| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. ३० जून २०२४
आपल्या बाॅलिवुड मधला एखादा परफेक्ट सिनेमाला अगदी कांटे की टक्कर देणारी आजची T20 world cup final match होती. सुरुवातीलाच भाई-भाई का बिछडना (रोहित-पंतची विकेट), बडे भाई विराटचे हिरोईन (साऊथ आफ्रिकन गोलंदाजी) बरोबर मस्त पैकी हमखास हिट होईल असे गाणे, इंटरव्हल नंतर आम्हा पामर प्रेक्षकांना सस्पेन्स, काॅमेडी आणि शेवटी एक प्राऊड मोमेंट देणं... फुल्ल पैसा वसूल पिक्चर बाॅस.
पाकिस्तानच्या तोंडातला नाही तर पोटातला घास रोहित आणि कंपनीने काढला होता, वरून त्यांच्या एका प्लेअरच्या जवळ जाऊन आपला कॅप्टन त्याचे सांत्वन पण करून आला. भाई, कोकणातल्या माणसाला मासे खाणे आणि टीम इंडियाला प्रेशर मध्ये खेळणे शिकवू नये हे म्हणतात ते उगाच नव्हे. तर, ऑस्ट्रेलियाला आरामात लोळवून आणि बांगलादेश,इंग्लंडचा व्यवस्थित प्रोग्रॅम करून आपला भारतीय संघ अगदी राजेशाही थाटात फायनलमध्ये आला होता. बस्स एक और धक्का आणि मग आपणच राजे. पण तरीही...२०२३, अहमदाबादची आठवण आणि जखम अजूनही ताजी होती. समोर 'चोकर' म्हणून हिणवला गेलेला साऊथ आफ्रिकन संघ ...कमी तर नाही पण बऱ्यापैकी ताकदवान होता.
बार्बाडोस मध्ये टाॅस जिंकून बॅटींग घेण नक्कीच करेक्ट डिसिजन होता पण सुरूवातीच्या तीन धक्क्यानंतर थोडे टेन्शन तर आले पण एक रिलीफ होता की किंग कोहली क्रिजपे था. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये मिळून कोहलीच्या ७५ धावा लागलेल्या होत्या त्याच कोहलीने आज एक बाजू लावून धरत आणि आफ्रिकन गोलंदाजी फोडत ७६ धावांची मेजवानी पेश केली. अगदीच फुल्ल थाळी नसली तरी श्रीखंड बासुंदीची कमतरता तर नक्कीच नव्हती. पंगतीला पटेल, दुबे ही मंडळी मसालेभात फस्त करून गेली. पण विराटने आज परत एकदा दाखवून दिले की तो किंग कोहली का आहे. त्याच्या न चालणाऱ्या बॅटमुळे काही लोकांना तो खटकत होता परंतु तोच आजच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो होता.
बुमराह आणि हर्षदीपचा सुरुवातीचा स्पेल वाखाणण्याजोगा होता. त्यात हेनड्रीक्सचा बोल्ड म्हणजे सोने पे सुहागा. डीकाॅक आणि स्टब्सने धाकधूक वाढवलेली पण बोरीवली दहिसरला उतरून रिक्षा पकडून ते आल्या पावली परत पण गेले. आता उरलेले क्लासेन आणि मिलर विरारपर्यंत पोचतात का तेच पाहायचे होते. इथे रोहितची कॅप्टन्सी, पंड्याची बाॅलींग आणि सूर्यकुमारने हवेतल्या हवेत घेतलेला अफलातून झेल ह्या गोष्टी एकदम परफेक्ट जमून आल्या. तत्पूर्वी परत एकदा बुम बुम बुमराहचा अप्रतिम स्पेल. बुमराहने त्याचा वरचा क्लास परत एकदा दाखवलाच. विजयाचे पारडे एका क्षणी आफ्रिकेच्या बाजूने झुकले देखील होते. ३० बाॅल ३० रन्स आणि ६ विकेट हाताशी पण तिथून विजयाचा घास टीम इंडियाने हिरावला.
परफेक्ट टीम वर्क.
शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलेली मॅच जेव्हा आपण जिंकली तेव्हा अनेकांनी पाजळलेले अकलेचे तारे पण निखळून पडले. कोणते? अहो, वाॅनच्या मायकेलचे, शेजारच्या इंझीचे.
सरतेशेवटी, एकदम परफेक्ट एन्डीग. वेल प्लेड टिम इंडिया. You made us feel proud again. Take a bow. Thanks a ton!!!
©️ योगेश तोरणे (Montreal)