Sangli Samachar

The Janshakti News

तुम्हाला ठाऊक आहे का, पृथ्वीचे वजन किती आहे?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
संपूर्ण विश्वात असंख्य ग्रहमाला आहेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यामध्ये आपल्या सूर्यमालेचाही समावेश होतो. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार, पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्यावर सजीवसृष्टी आढळते. पृथ्वीवरच्या या सजीवसृष्टीमध्ये कमालीची जैवविविधता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ही जैवविविधता एका दिवसात निर्माण झालेली नाही. त्यासाठी अब्जावधी वर्षांचा कालावधी लागलेला आहे. पृथ्वीचं वय किती आहे, हे माहिती आहे का? काहींना कदाचित या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल; पण ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी इथे माहिती देत आहोत.

शास्त्रज्ञ पृथ्वीबद्दल वेगवेगळं संशोधन करून त्याचे निष्कर्ष जाहीर करत असतात. पृथ्वीच्या अचूक वयाबाबतही सतत संशोधन सुरू असतं. हाऊ स्टफ वर्क्स वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पृथ्वीचं खरं वय शोधण्याचा प्रयत्न शतकानुशतकं केला जात आहे. सर्वांत लोकप्रिय थिअरीनुसार, पृथ्वीचं वय 450 कोटी वर्षं आहे. पृथ्वीच्या वयाबद्दल वेगवेगळे अंदाज लावले गेले आहेत. ग्रीक तत्त्ववेत्ते अरस्तू यांनी पृथ्वीचं वय असंख्य वर्षं असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय प्राचीन भारतातल्या विद्वानांनी बिग बँगसारख्या घटना लक्षात घेऊन त्या वेळचं पृथ्वीचं वय 190 कोटी वर्षं असावं असा अंदाज लावला होता. मध्ययुगात ख्रिश्चनांनी बायबलमध्ये पृथ्वीचं वय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते पृथ्वीचं वय पाच हजार ते सात हजार वर्षांच्या दरम्यान आहे. 1700 ते 1800 च्या दरम्यान अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे अंदाज लावले. काहींनी पृथ्वीच्या थंडपणानुसार तिच्या वयाचा अंदाज लावला, तर काहींनी गाळाच्या साठलेल्या अवस्थेनुसार अंदाज लावला.


पृथ्वीच्या वयाचा अचूक अंदाज 20 व्या शतकात बांधता आला. कारण, विसाव्या शतकात रेडिओमेट्रिक डेटिंग सुरू झालं. या पद्धतीचा वापर करून, शास्त्रज्ञ दगडातून बाहेर पडणारी किरणोत्सर्गाची ऊर्जा शोधतात. त्यातून दगडाचं वय मोजता येतं. 1953मध्ये क्लेअर पॅटरसन यांनी पृथ्वीचं वय 450 दशलक्ष वर्षं असल्याचा अंदाज वर्तवला. त्यांनी अनेक शतकांपूर्वी आकाशातून पडलेल्या उल्कांचं परीक्षण केलं आणि त्यावरून हा अंदाज काढला होता. अजूनही पृथ्वीच्या वयाबाबत सातत्याने संशोधन सुरू आहे. त्यासाठी पृथ्वीच्या गाभ्याचाही अभ्यास केला जात आहे.