yuva MAharashtra अंकली येथे नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको !

अंकली येथे नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको !

सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जून २०२४
हडपसर येथील जात्यंध व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची केलेले विडंबनाचा निषेध करीत अंकली गावानजीक हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रत्नागिरी नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांकडून विविध घोषणा देण्यात आल्या. व सदर घटनेतील संशयतांना ताबडतोब अटक करून त्यांना किमान दहा वर्षाची शिक्षा होईल, त्याचप्रमाणे असाच कायदा याच सत्रात संमत करावा अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात भाजपाचे पै. पृथ्वीराज पवार यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.