Sangli Samachar

The Janshakti News

वादप्रवादाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचे सुप वाजले; आता तयारी विधानसभेची !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २२ जून २०२४
अनेक वादप्रवादाच्या फेऱ्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या फेऱ्या संपल्या. आता विधानसभेची मुदत संपल्याने महाराष्ट्रसह इतर तीन राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल फुंकण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. याचा पहिला टप्पा मतदार याद्या अध्ययवत करण्याने होणार आहे. या तीनही राज्यांची निवडणूक एकत्रितपणे ऑक्टोंबर मध्ये निवडणूक आयोगाचा मनसुबा आहे.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत आठ नोव्हेंबर रोजी संपणार असून साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येथील सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्राबरोबरच हरियाणा राज्याचे मुदत तीन नोव्हेंबर रोजी संपणार आहे येथेही ऑक्टोबर मध्येच निवडणुका होऊ शकतात. तर झारखंडची मुदत जानेवारी महिन्यात संपत असल्याने तिथे मात्र या दोन राज्याबरोबरच निवडणुका शक्यता आहे.


महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्याबरोबरच जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक होऊ शकते. ही निवडणूक सप्टेंबर मध्ये निवडणूक आयोग घेऊ शकतो.

लोकसभा निवडणुक ऐन उन्हाळ्यात घेतल्यामुळे मतदारांना बराचसा त्रास सोसावा लागला होता. तर अनेक मतदार मतदानासाठी बाहेरच पडले नाहीत. काहींनी तर नियोजन केल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. दुसरे मतदान यंत्र जोडेपर्यंत बराचसा वेळ वाया गेला, त्यामुळे मतदारांना तिष्ठत थांबावे लागले . तर काही मतदार वैतागून घरी परतले या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक आयोगावर चोहोबाजूने टीका झाली. 


या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सजग झाला असून चारही राज्यांच्या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये, मतदारांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाप्रमाणेच महायुती आणि महाआघाडी यांच्यात जागावाटपावरून जोक हो झाला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी याचा निवडणुकीवर थेट परिणाम जाणवला. आता दोन्ही आघाड्या मागील चुका टाळून निवडणुकीस सामोरे जाण्याची शक्यता आहे. अर्थात लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जागा वाटपात "तू तू - मै मै" होना रे नक्की. यातून सर्वच राजकीय पक्षांचे श्रेष्ठ कसा मार्ग काढतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे.