| सांगली समाचार वृत्त |
बार्बाडोस - दि. ३० जून २०२४
बार्बाडोस येथे पार पडलेल्या ती ट्वेंटी सामन्यांमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेची रंगला होता. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरले होते. दोघांनीही मेहनत केली. पण शेवटी जीत भारतीय संघाचे झाली. आणि सर्व जगभरातील क्रिकेट प्रेमींनी भारतीय खेळाडूंचे तोंड भरून कौतुक केले.
मैदानातील काही चुकांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना क्रिकेट प्रेमीच्या शाब्दिक फटक्यांना सामोरे ही जावे लागले तर कधी त्याने केलेल्या अप्रतिम खेळाबद्दल कौतुकाचे बोल हे पदरी पडले.
सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले होते, तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चेहरे पराभवाने उतरलेले होते. दोन्ही संघातील खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते. भारतीय संघातील खेळाडूंच्या डोळ्यातील अश्रू विजयाचे तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यात व पराजयाचे...
याच दरम्यान भारतीय संघाचा कणा असलेल्या ऋषभ पंत याने असे काही कृत्य केले की ज्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याचे झाले असे, क्षेत्ररक्षणाच्या वेळी यष्टीरक्षक म्हणून स्टंपच्या मागे अद्वितीय कामगिरी केलेला, तर बॅटिंगसाठी उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डिकॉकने 31 बॉलमध्ये 39 रन केले. यादरम्यान त्याने 4 फोर आणि 1 सिक्सही लगावली. परंतु भारतीय संघाच्या खेळाडूंनी केलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला पराभवास सामोरे जावे लागले. त्यावेळी तो आपल्या मुलीला कवटाळून मैदानावर चेहरा पाडून बसला होता. त्यावेळी भारतीय यष्टिरक्षक वृषभ पंत हा त्याच्याजवळ केला खूप दीपकच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शाब्दिक आधार दिला. त्याचे हे कृत्य डीकॉकला पुढील सामन्यांसाठी बळ देईलही... पण या कृत्यामुळे ऋषभ पंत ने मात्र मैदानावर उपस्थित असलेल्या लाखो क्रिकेट प्रेमी प्रमाणेच टीव्ही संचासमोर बसलेल्या करोडो क्रिकेट प्रेमींचे मन मात्र हृदय जिंकले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.