yuva MAharashtra समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिज रस्त्यावर मनाई आदेश जारी

समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिज रस्त्यावर मनाई आदेश जारी



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जून २०२४
44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजीणी 4 जून 2024 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक येण्याची शक्यता आहे.

  मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 5 ते मतमोजणी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी सेंट्रल वेअर हाऊसचे मुख्य गेट समोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सेंट्रल वेअर हाऊसचे मुख्य गेट समोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर बिग्रेड व इतर शासकीय वाहने या खेरीज इतर सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.


मनाई करण्यात आलेल्या मार्गास पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून समता नगरकडून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी समतानगर- मिरज रेल्वे स्टेशन रोड-आंबेडकर उद्यान-वंटमुरे कॉर्नर पासून सांगलीकडे (परतीचा मार्ग तोच रोहील) तर कृपामाई ब्रिजकडून समतानगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी- कृपामाई ब्रिज-वंटमुरे कॉर्नर-रेल्वे स्टेशन रोड मार्गे समतानगर (परतीचा मार्ग तोच राहील).

मतमोजणी दिवशी सकाळी 5 पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पार्किंगसाठी (१) मारुती मंदिर ते सूतगिरणीकडे जाणारे रोडचे उत्तरेस- भूमापन क्र. 926, (2) शेठ रतीलाल गोसलिया डी. एड. कॉलेजचे पूर्व बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 878, (3) सुखसमृद्धी अपार्टमेंटच्या पूर्व बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 919, (4) सुखसमृद्धी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 919 आणि (5) भोकरे कॉलेज आवारातील मोकळे मैदान अधिगृहीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक श्री. घुगे यांनी आदेशात नमूद केले आहे.