Sangli Samachar

The Janshakti News

मिरजेत गांजाचे हुक्काबार चालवणाऱ्या बारवर राज्य उत्पादन शुल्कची मेहरनजर ?


सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २७ जून २०२४
पुण्यातील पोरशे कार अपघातानंतर हुक्का पार्लर पब पहाटेपर्यंत सुरू असणारे बार यावर राज्यात सातत्याने चर्चा होत आहे विरोधी पक्षातील नेत्यांनी तर विद्येच्या बाहेर घराचे ड्रग्स आणि पक्ष माहेरघर बनवल्याचा आरोप केला आहे पुण्यातील या घटना नंतर संपूर्ण राज्यातील बेकायदाबार वर हातोडाचालवला आहे. परंतु काही ठिकाणी असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या बारवर त्या ठिकाणच्या राज्य उत्पादन शुल्कचे लेहर नजर असल्याचे उघडकीस आले आहे.

असाच एक प्रकार नुकताच मिरजेत उघडकीस आला असून येथील काही बार मध्ये गांजाचे हुक्का बार उपलब्ध करून देत असल्याचे चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे शिवाय काही बार मध्ये तर खुलेआम परवानाशिवाय असे होका ओढताना अनेक तरुण-तरुणी दिसत असल्याचीही सुरू आहे. तेव्हा या बार चालकांना सांगलीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मेहर नजर आहे का असा प्रश्न नागरिकाकडून विचारला जात आहे. गांजा पिऊन हे गांजाडे अनेक काळे धंदे करीत असतात. नागरिकांना धमकावणे, त्यांच्यावर धावून जाणे, मारहाण करणे, काही प्रसंगात तर कोणासारखे गंभीर प्रकार घडले आहेत. तरीही अशा गांजाड्यांना थारा देणाऱ्या बारला अभय का ? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.