| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ६ जून २०२४
जागतिक पर्यावरण दिनाच्या दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी पुण्यात ऐतिहासिक अशा जगातील सर्वात मोठ्या पायऱ्यांच्या विहिरीची पायाभरणी केली जाणार आहे. भारतातील पहिल्या शाश्वत टाउनशिपमध्ये बांधण्यात येणारी ही स्टेप-वेल गेल्या 500 वर्षांतील अशा प्रकारचा पहिला जलसंधारण प्रयत्न असेल. इव्होग्रीन सिटी, ऑरेंज काउंटीद्वारे विकसित, इव्होग्रीन सिटी, देहू, पुणे येथे गुरुवार 6 जून रोजी संध्याकाळी जगातील सर्वात मोठ्या स्टेपवेलच्या बांधकामाची सुरूवात होणार आहे.
प्राचीन जलसंधारण तंत्र आणि स्थापत्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, लोक खास गुजरात आणि राजस्थानमधील पायऱ्यांच्या विहिरीला भेट देत असताना. आता पुण्यात लवकरच जगातील सर्वात मोठी स्वतःची अशी पायऱ्यांची विहिर असेल. पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी ओळखले जाणारे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संदीप सोनिग्रा हे इव्होग्रीन सिटीमध्ये जगातील सर्वात मोठी स्टेपवेल बांधणार आहेत. इव्होग्रीन सिटी ही देशातील पहिली शाश्वत टाऊनशिप असेल, जी देहूमध्ये सुमारे 45 एकर जागेत बांधली जाईल. याच्या शेजारी सुमारे 70 एकर जंगल आणि एक किलोमीटर इंद्रायणी नदी वाहते. दोन जर्मन विद्यापीठांनी राबविलेल्या नूतनीकरणीय ऊर्जा आणि साठवलेल्या पाण्यावर हा संपूर्ण टाउनशिप अवलंबून असेल.
साधारण 90 हजार क्यूबिक मीटरच्या व्हॉल्यूमसह, ही विहीर राजस्थानच्या अभानेरी स्टेपवेलपेक्षा चार पट मोठी असेल, ज्याचे व्हॉल्यूम 24 हजार घन मीटर आहे. इथे पावसाच्या पाण्याचे जतन करून, गावातील 15 हजार रहिवाशांची पाण्याची गरज भागवली जाईल यासह शिवाय भूजल पातळी वाढून संपूर्ण देहू गावाला त्याचा फायदा होईल. स्टेपवेलच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पायाभरणी गुरुवारी होणार आहे. संपूर्णपणे दगडांनी बनवलेली ही पायरी विहीर पहिल्या टप्प्यात 10 मीटर खोल असेल आणि पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी तिचे उद्घाटन होईल. दुसऱ्या टप्प्यात, स्टेपवेल 20 मीटर खोल जाईल, जे पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. राजस्थानमधील बहुतेक स्टेपवेल सुमारे 900 वर्षे जुन्या आहेत. त्यानंतर साधारण 500 वर्षांपूर्वी तेलंगणामध्ये अशी एक विहीर बांधली होती. आता त्यानंतर पुण्यात अशा विहिरीचे बांधकाम होत आहे. इव्होग्रीन टाउनशिपमध्ये बांधकामासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याव्यतिरिक्त, बांधकामानंतरच्या बाबींमध्ये नवीकरणीय उर्जा आणि पायरी विहिरीतील पाण्याचा संपूर्ण वापर समाविष्ट असेल.