Sangli Samachar

The Janshakti News

पूर परिस्थितीत एक दिलाने काम करू, पूर परिस्थितीवर नक्की मात करू - शुभम गुप्ता



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १३ जून २०२४
सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह मध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत, सामाजिक संस्था, कार्यकत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीवर उपाययोजना आणि सामाजिक संस्था, कार्यकत्यांनी यांच्या समनव्यातुन आपत्तीवर मात करण्यासाठी सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश साखळकर यांनी सन २०१९ मधील पूरपरिस्थिती बाबत माहिती देऊन प्रशासनने येणाऱ्या पूर काळात पूर बाधित क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशी यांना सूचना देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी काळजी घ्यावी, विसावा मंडळ, यांच्या वतीने संजय चव्हाण यांनी प्रशासनास सर्व सहकार्य करण्यात येणार आहे, असे नमूद करून काही महत्वाच्या मुद्यावर आपले मत नोंदविले आहे, रॉयल बोट क्लब दत्ता पाटील यांनी प्रशासनास सर्व सहकार्य करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे असे सांगितले आहे, माजी सभागृह नेत्या भरतीताई दिगडे यांनी शहरातील पूर काळात वाहतूक आणि पाळीव प्राणी यांची रहिवाशी यांनी वेळेत काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सक्त सूचना देणे आवश्यक आहे, असे नमूद केले आहे. सन्मा माजी नगरसेवक अभिजित भोसले पूर पट्टामधील नाले गैर प्रकारे वळवू नयेत, यासाठी प्रशासनाने पाहणी करून त्या कामी पूर परिस्थितीपूर्वी दक्षता घ्यावी, सांगलीकर म्हणून आम्ही पक्ष आणि अन्य भेद न ठेवता आपत्ती मध्ये प्रशासनाच्या बरोबर काम करण्यास तयार असणार आहे, असे नमूद केले. अनिरुद्ध पाटील, रोनक हर्षद सचिन साळूखे यांनी वन प्राणी याचा स्थलांतर करण्यास सहकार्य करणार असे सांगितले, अमोल पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपत्तीमध्ये महापालिका क्षेत्रात वैद्यकीय सेवा देण्यास तयार आहे.


नव्याने महामार्गावर होत असलेला भराव जास्त प्रमाणात होत परिणामी पुढे महापूर येण्यास कारणीभूत ठरते, त्याबर लक्ष प्रशासनाने काळजी घ्यावी असे सुचविले आहे, प्रदीप पवार यांनी पूर परिस्थितीत वाहन दुरुस्ती बाबत सहकार्य करण्याची तयारी केली आहे, मदनी मुस्लिम संघटना यांनी देखील सर्व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तयार दाखविली आहे. माजी नगरसेविका बेलवलकर यांनी सांगली गावभाग मधील समस्या बाबत माहिती देऊन पूर परिस्थितीत सोलर लाईट आणि बोट सुविधा उपलब्ध करून देण्यास विनंती केली आहे, अनिरुद्ध उपासना फोडेशन रवींद्र बेडखळे, राहुल डोपे पाटील, यांनी हॅम रेडिओ व्दारे सहकार्य करण्यासाठी प्रशासन बरोबर राहणार असे सांगितले आहे. अनेक सामाजिक संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे राहून पूर परिस्थिती बाबत आपले मत नोंदविले आहे, यावेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, विशेष कार्यकारी अधिकारी आपत्ती स व्यवस्थापन, नकुल जकाते, जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद, मुख्य अग्रिशमन अधिकारी सुनील माळी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉरवींद्र ताटे, आयुक्त यांनी सर्वांचे आभार मानले.