Sangli Samachar

The Janshakti News

गोवा येथे संपन्न होणाऱ्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवासाठी, सांगली जिल्ह्यातून विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २२ जून २०२४
अलीकडील माता वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांच्या बसवरील भ्याड हल्ला असो, किंवा रोहिंग्यांचे भारतात होणारे अवैधानिक प्रवेश असोत. देशाच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असल्याने हिंदूंची इकोसिस्टीम निर्माण करून नियोजनबद्ध कार्य करण्याची आवश्यकता आहे. याच हेतूने पृथ्वीवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदू बहुल भागात आपला जम बसवू लागला आहे. गेल्याच महिन्यात कोल्हापूर येथे काही बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असलेले बांगलादेशी नागरिक सापडले. अशाच पद्धतीने देशाच्या विविध भागात देशाला खिळखळी करणारी यंत्रणा पसरत असून याला आळा घालण्याची गरज आहे. ही षडयत्रे रोखण्यासाठी हिंदूंनी विविध संघटनांची चौकट मोडून एकाच ध्वजाखाली एकत्र येण्याची आवश्यकता आहे.


विविध देशातील वाढत जाणारी युद्धे, अस्थिरता पाहता हिंदू धर्म हा एक मात्र धर्म आहे, जो विश्वबंधुत्वाची आणि 'वसुधैव कुटुंबकम'ची संकल्पना मांडून सर्व समाजाला एकत्रित बाजू शकतो. याचसाठी हिंदू कार्याला गती देण्यासाठी दि. 24 ते 30 जून 20 24 या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान फोंडा, गोवा येथे संपन्न होणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे श्री संतोष देसाई यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदू राष्ट्राचे संबंधित विविध विषयावर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा करण्यात येणार आहेत यासाठी अमेरिका, इंग्लंड, बांगलादेश, धाना, नेपाळ दक्षिण आफ्रिका या देशातून प्रतिनिधी येणार आहेत. सांगली जिल्ह्यातूनही विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही संतोष देसाई यांनी दिली.