Sangli Samachar

The Janshakti News

स्व. खा. प्रकाशबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आदरांजली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
सांगली जिल्हयाचे माजी खासदार स्व. प्रकाशबापू पाटील यांची ७७ वी जयंती निमीत्त त्यांचे कृष्णाकाठी असणारे समाधी स्थळी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. प्रतिकदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीवहिनी पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, पी.व्ही.पी.आय. टी कॉलेज बुधगाव, जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली येथेही आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज (बाबा) पाटील, ॲड. सी. आर सांगलीकर, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर किशोर शहा, मा. नगरसेवक उत्तम साखळकर, मा. नगरसेविका वहिदा नायकवडी, मा. जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, सांगली जिल्हा काँग्रेसचे खजिनदार पी. एल. रजपूत सर, सुभाषतात्या खोत सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस, विश्वासबापू पाटील, जि.प. सदस्य प्रकाश कांबळे, सदाशिव खाडे, सदानंद कबाडगे, प्रदीप सावंत, कवठे महंकाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय हजारे, विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्रामदादा पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, आनंदराव नलवडे, वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष सुनिल आवटी, संचालक अमितदादा पाटील, गणपतराव सावंत, माजी संचालक सुरेश पाटील, सचिन डांगे, एम.डी. संजय पाटील, साखर कामगार युनियन (इंटक) सांगलीचे प्रदिप शिंदे, पद्मभुषण वसंतदादा पाटील इंजिनिअरींग कॉलेज डिग्रीचे प्राचार्य बी.एस पाटील सर, रजिस्टार संदीप उमराणी, वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष अशोकदादा पाटील, वसंतदादा दुध संघाचे माजी अध्यक्ष उदय पवार, प्रा. सिकंदर जमादार सर, सुभाष यादव, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले, काँग्रेस सेवादलाचे शहर जिल्हा अध्यक्ष पै. प्रकाश जगताप, शेतकरी संघटनेचे प्रदिप पाटील, भारत बोथरा, बाहुबली कबाडगे, विशालदादा पाटील युवा प्रतिष्ठान अध्यक्ष हेमंत उर्फ बंडू पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस अपंग विभाग अध्यक्ष सुरेश गायकवाड, आदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.