| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. १ जून २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये फाटा येथील घरात प्रथमच दुर्मिळ लुसिस्टिक साप आढळला आहे. हा विषारी साप मन्यार आहे, मात्र त लुसिस्टिक असल्याकारणाने त्याचा मूळ रंग नाहीसा होऊन पूर्णपणे पांढरा झालेला आहे. ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. अशा प्रकारचे साप तयार झाल्यानंतर ते कोणत्या जातीचे आहेत हे ओळखता येत नसल्याने अनावधानाने त्याला हाताळलं जातं आणि त्यातूनच दंश होतो प्राणीमित्र तेजस जाधव यांनी सांगितलं.
सर्पमित्र देवेंद्र हलगी आणि सौरभ कदम या दोघांना शिये फाटा येथील घरात एक पांढऱ्या रंगाचा साप आढळून आला. पांढऱ्या रंगाचा साप असल्याकारणाने त्यांनी छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे प्राणीमित्र तेजस जाधव आणि विनायक आळवेकर यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. तेजस जाधव यांनी शिये फाटा येथे येवून विषारी साप मन्यार आहे. पण लुसिस्टिक असल्याकारणाने त्याचा मूळ रंग नाहीसा होऊन हा पूर्णपणे पांढरा झालेला आहे आणि ही घटना अतिशय दुर्मिळ आहे असे तेजस जाधव यांनी सांगितले.
अशा प्रकारचे साप तयार झाल्यानंतर ते कोणत्या जातीचे आहेत हे ओळखता येत नसल्याकारणाने अनावधानाने त्याला हाताळले जातं आणि त्यातूनच मग दंश होतो. त्यामुळे सर्पमित्रांनी असे साप आढळल्यानंतर काळजीपूर्वक आधी जाणकार लोकांना विचारून मगच त्या सापाला सुरक्षित रित्या पकडावे त्यानंतर मग तो साप वनविभागाकडे जमा करण्यात आला. त्या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षित रित्या सोडून दिले.