yuva MAharashtra तुकोबारायांचे थेट दहावे वंशज ह. भ. प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे काल देहावसान !

तुकोबारायांचे थेट दहावे वंशज ह. भ. प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे काल देहावसान !


सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २७ जून २०२४
संत साहित्याचे अभ्यासक, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, तुकोबारायांचे थेट दहावे वंशज ह. भ. प. संभाजी महाराज मोरे देहूकर यांचे काल देहावसान झाले
ह.भ.प. संभाजी महाराज हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील देहूगाव येथील रहिवासी आहेत. संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून, कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन करताना या माध्यमातून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवन कार्याचा प्रसार-प्रचार केला आहे. त्यांनी अनेक वर्ष अनवाणी वारी केली आहे. आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचने केली आहेत. मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्ष होते.

देहूकर महाराजांच्या पार्थिवावर इंद्रायणी काठी श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी काल दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावातील नागरिकानी त्यावेळी उपस्थिती दर्शवली होती.


संभाजी महाराज यांच्या कीर्तनाची परंपरा त्यांचे चिरंजीव प्रशांत महाराज देहुकर हे पुढे नेत आहेत.

तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अवघे दोन दिवस बाकी असताना वंशाजाचे निधन झाले आहे. संत तुकाराम महारांजांचे वंशज परंपरागत वारसा पुढे चालवत आहेत. सांभाजी महाराज यांनी राज्यात अनेक ठिकाणी जाणून कीर्तन सेवा केली आहे. संभाजी महाराज यांच्या जाण्याने मोरे घराण्याचे मोठे नुकसान झाले आहे. संभाजी महाराज्यांची कीर्तन सेवा अखंड महाराष्ट्रभर परिचित होती. त्यांच्या कीर्तन सोहळ्याला नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असत. त्यांच्या आत्म्यास शान्ति मिळो अशी भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.