भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवरील खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या वर गेली आहे. लग्न कार्याच्या निमित्ताने सग्यासोयऱ्यांच्या गाठीभेटी होतात, सुख-दुःखाचे वार्तालाप होतात, शेतमालाचे भाव, नवीन जाती, राजकारण, समाजकारण असे दहा- पाच वर्षापूर्वी होत असे. अलीकडे लग्न अडीच- तीन तास उशिरा लागतात, मग शुभमुहूर्त व लग्नतिथी आपण का काढतो हेच कळत नाही. ऑर्केस्ट्रा व डी जे च्या प्रभावामुळे कान बहिरे होतात व हृदयाचे ठोके वाढतात, ना कुणासोबत बोलणे ना ख्यालीखुशाली विचारता येत, ना कुठले फोन घेता येत. अलीकडे सर्व समाजात (मारवाडी, ब्राह्मण, गुजराती व सिंधी समाज याला अपवाद आहे.) चोरपावलांनी नकळत काही विकृत्या घुसल्यात. लग्नकार्यादी प्रसंगातील मांगल्य आणि पावित्र्य पार हरवले आहे. हौसेच्या नावाखाली केवळ उधळपट्टी व फक्त प्रदर्शनाने जागा घेतली.
एका सर्वेक्षणानुसार, भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवर खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या (GDP ) वरची गेलेली आहे. सनातनमध्ये लग्न हा एक विधी होता जो आता इव्हेंट बनला आहे. पूर्वी, विवाह समारंभ म्हणजे पवित्र विधी ज्याने दोन व्यक्तींना जोडल्यासारखे वाटत होते. रितीरिवाज आणि विधी ज्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना ओळखत होते, आणि विवाह देखील आदराचा विषय होता पूर्वी हळद, मेंदी, हे सर्व घरातच केले जायचे आणि कुणाला याची माहितीही नव्हती. याआधी मंडपात कोणत्याही थाटामाटात होणारी लग्नेही लग्नेच होती आणि तेव्हाचे वैवाहिक जीवन खूप सुखावे होतेः पण समाज आणि सोशल मीडियाला शो ऑफच्या म्हणजेच दिखाऊपणाच्या भूताने इतके पछाडले आहे, की काय करावे आणि काय करू नये याचे कोणालाच भान राहिले नाही. आपण एकमेकांपेक्षा अधिक आधुनिक आणि श्रीमत आहोत हे दाखवण्यासाठी लोकांनी टोकाचे प्रदर्शन सुरू केले आहे आणि आता त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. अट्ठेचाळीस किलोच्या मुलीला पंचवीस किलोचा लेहेंगा भारी वाटणार नाही का? हा विचार कुणालाच कधी पडला नाही, बाहेरचे जाऊ द्यात घरातील आई- वडिलांना पण हे लक्षात येत नाही आपल्या पालकांच्या चांगल्या शिकवणीच्या तुलनेत कित्येक किलो मेक-अप हलका वाटतो.
एखाद्याने साध्या पद्धतीने विवाह केला, तर समाजात तो व्यक्ती टीकेचा विषय बनतात.
प्रत्येक कार्यक्रमात तासनतास फोटोशूट करून थकत नाही; पण लग्नसोहळा सुरू होताच, पंडितजी, त्वरा करा, ही किती लांबलचक पूजा आहे, हे सांगतानाही लाज वाटत नाही. हे मला जगातील आरुवे आश्चर्य वाटते. विवाहहा एक विधी आहे, हौस मौज करण्याचे इव्हेंट नाही है हल्ली लोकांच्या लक्षातच येत नाही. एखाद्याने साध्या पद्धतीने विवाह केला, तर समाजात तो व्यक्ती टीकेचा विषय बनतात. इलका समाजहा असंवेदनशील झाला आहे. केवळ नेते मंडळी, सेलिब्रिटी यांची नक्कल करून त्यांच्या सारखे इव्हेंट करणे आणि राहिलेले आयुष्य कर्ज फेडण्यात घालवणे यात मला तरी फार योग्य वाटत नाही आणि एव्हढे करूनही आजकाल लग्नही फार काळ टिकत नाहीत, हे फार मोठे वास्तव आहे.
आजची लग्ने थक्क करणारी आहेत
विशेष म्हणजे हे एक सामाजिक बंधन बनत चालले आहे. उत्तर भारतात लग्नांमध्ये होणारी उधळपट्टी हळूहळू शिगेला पोहोचली आहे आणि आता त्यात महाराष्ट्र देखील अग्रेसर होत आहे.. पूर्वी लग्नसोहळे, हार-तुरे, सर्व काही मंडपात व्हायचे. एकाच साच्यात, एकाच कार्यालयात या सर्व गोष्टी दिसायच्याः पण आता वेगवेगळ्या स्टेजचा खर्च वाढला आहे. आता हळद आणि मेहंदीच्या इव्हेंटच्या तर किमतीही वाढल्या आहेत. प्री-वेडिंग फोटोशूट, डेस्टिनेशन वेडिंग, रिसेप्शन, आता एंगेजमेंटचा भव्य टप्पाही तयार होत आहे. टीव्ही मालिका पाहण्यात सर्वांनाचा रस असतो. पूर्वी मुले जुने कपडे घालून हळदीत बसायची, आता हळदीच्या कपहघांना पाच ते दहा हजार रुपये लागतात. अगदी रंगाचे कट टू कट मॅचिंग बघितले जाते..
प्री वेडिंग शूट, फर्स्ट कॉपी डिझायनर लेहेंगा, हल्दी मेहंदीसाठी थीम पार्टी, लेडीज संगीत पार्टी, बॅचलर पार्टी, हे सर्व मुलीने तिला अभिमान वाटावा, अशा पद्धतीने आई-वडील खर्च करत आहेत. जर मुलीच्या वडिलांनी खर्च कमी केला, तर त्यांची मुलगी म्हणते की लग्न एकदाच होते आणि अगदी मुलांचेही असेच आहे; पण एव्हढा खर्च करूनही लग्न टिकवण्याची चहपह कुणातही दिसून येत नाही हे खरेच आमचे दुर्दैव आहे. मजेशीर गोष्ट अशी आहे, की स्वतः मुलाला आणि मुलीला खूप फिल्मी फ्रिल्स हवे असतात, मग ते प्री-वेडिंग शूट असो किंवा महिला संगीत, यावर कुठेही नियंत्रण नाही. मुलीचे भवितव्य सुरक्षित करण्याऐवजी ते पाण्यासारखे पैसे उधळतात. आता मुला-मुलींना त्त्वताहून त्यांच्या पालकांकडून खर्चाचे पैसे मिळतात, पण पालक एव्हढे पैसे खर्च करताना मुलांना त्याचे महत्त्व पटवून देत नाही. परिणामी होणाऱ्या लाखो रुपयांच्या चुराड्धाची मुलांना किंमत नसतेच. मुलांचे कुटुंब लग्नावर मुलीच्या कुटुंबाइतकेच खर्च करत अहेत. आता मुलीच्या नवन्याला मुलाइतकेच नियंत्रण हवे आहे. दोघंही आपला शो ऑफ ठेवण्यासाठी कर्ज घेऊन समारंभ साजरे करीत आहेत..
लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शनची क्रेझ
इटालियन, साऊथ आणि नॉर्थ इंडियन, कॉन्टिनेन्टल डिशेस, पनीर हे एकेकाळी श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांचे आवडते पदार्थ होते, पण आता मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकही त्यांना फॉलो करू लागले आहेत. नात्यातील गोडवा संपला आणि हे सगळे नाटक सुरू झाले. एक बलाढ्य, तर दुसरा दुर्बलही अडकत चालला आहे. आता लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शनची क्रेझ झपाट्याने वाढत चालली आहे. हळूहळू एकमेकांपेक्षा मोठे दिसण्याची स्पर्धा ही सामाजिक मजबुरी बनत चालली आहे. या सगळ्यात मध्यमवर्गीय कुटुंबे अडचणीत येत आहेत कारण त्यांनी तसे न केल्यास ते समाजात चेष्टेचा विषय होऊ शकतात. यामध्ये सोशल मीडिया आणि लग्न व्यवसाय करणाऱ्या कंपन्या प्रमुख भूमिका बजावत आहेत. तुम्ही हे केले नाही, तर लोक काय म्हणतील/विचारतील ही भीतीच तुम्हाला हे सर्व करायला लावते आणि तसे लोक बोलून दाखवतात. कुटुंब सुखी राहते म्हणून आयुष्यभर कष्ट करून पैसे कमावणाऱ्या त्या बापाला किंवा आईला कोणीही विचारत नाही. म्हातारपणात त्याला कोणी विचारेल, तू आमच्यासाठी काय केलेस?’ या भीतीपोटी तो हा सगळा फालतू खर्च करतो. अशा चुकीच्या विचारसरणीपायी बरबाद होत असलेला समाज कमी करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा अनिबंध पैशाचा वाढता बोजा वैदिक वैवाहिक विधी नष्ट करेल आणि मग लग्न म्हणजे फक्त एक इव्हेंट म्हणून साजरा होईल आणि त्यातील मांगल्य, पवित्रता, धार्मिकता हळूहळू दिसेनाशी होईल.. प्रश्न गंभीर आणि सामाजिक आहे. पण त्यावर विचार करायला कुणालाच वेळ नाही. समाजाची अधोगतीकडे होत असलेली ही वाटचाल थांबवणे गरजेचे आहे.
शुभमुहूर्त व लग्नतिथी आपण का काढतो
लग्न कार्याच्या निमित्ताने सग्यासोयऱ्यांच्या गाठीभेटी होतात, सुख-दुःखाचे वार्तालाप होतात, शेतमालाचे भाव, नवीन जाती, राजकारण, समाजकारण असे दहा- पाच वर्षांपूर्वी होत असे. अलीकडे लग्न अडीच-तीन तास उशिरा लागतात, मग शुभमुहूर्त व लग्नतिथी आपण का काढतो हेच कळत नाही. ऑर्केस्ट्रा व डी जे च्या प्रभाठामुळे कान बहिरे होतात व हृदयाचे ठोके वाढतात. ना कुष्णासोबत बोलणे ना ख्यालीखुशाली विचारता येत, ना कुठले फोन घेता येत. अलीकडे सर्व समाजात (मारवाडी, ब्राह्मण, गुजराती व सिंधी समाज याला अपवाद आहे। चोरपावलांनी नकळत काही विकृत्या घुसल्यात. लग्नकार्यादी प्रसंगातील मांगल्य आणि पावित्र्य पार हरवले आहे. हौसेच्या नावाखाली केवळ उधळपट्टी व फक्त प्रदर्शनाने जागा घेतली. पदरमोड करून, सखस्ता खाऊन लानाला येणाऱ्या राग्या सोयायांच्या वाटयाला छळ व निराशाच पदरी पडते. आपण कष्टाने कमावलेला पैसा कुणाचे तरी घरे भरण्यात समाजाची उर्जा वाया जात असून कर्कश आवाजाने व बेशिस्त नियोजनामुळे आपण जीवलगांच्या भेटीचा आनंदही उपभोगू शकत नाही. जुन्या काळी लग्नादी कार्यप्रसंगात सोयरिक संबंधाच्या गोष्टी व्हायच्या. खऱ्या अर्थाने एकमेकांचा अधिक जवळून परिचय व्हायचा. आताच्या बदलाने ती संधी पण नाकारली जात आहे. जो तो आपल्याच तोऱ्यात असल्याने आदरातिथ्य तर सोडाच जीवाभावाने कुणी कुणाची विचारपूसही करायला तयार नाही. विवाह
योग्य मुलामुलींचा व त्यांच्या पालकांचा परिचय व व्यक्तिमत्त्वातील चांगले वाईट पैलू तपासून पाहाता येत नाहीत, याचे अतीव दुःख आहे. जेवणात मानपान तर सोडाच, पण कमालीची कसरत करून पंगतीला जागा मिळविणे किंवा डिश मिळविणे याकरिता लाजिरवाणी कसरत ठरते आहे. आमंत्रितांची गर्दी नियंत्रित करताना नियोजन करणाऱ्या जवळची मंडळींची अक्षरशः दमछाक होते लग्नकार्याचा आनंद घेणे तर दूरचः पण संपूर्ण दिवस कमालीचे दडपण वधूपिता व कुटुंबातील सदस्य सहन करताना दिसतात. मग प्रश्न पडतो विराट कोहली पंचवीस लोकांत आमचे साहेब त्यांच्या मुलीच्या लग्नात शंभर आमंत्रितांमध्ये लग्न आटोपतात मग आपण एकही हजार पंधराशे, दहा हजार लोकांची गर्दी एप्रिल अन मेच्या जीवघेण्या उन्हाळ्यात जमवून काय साध्य करतो. आता करावे काय? सहन करण्याशिवाय उपाय नाही व आपले कोणी ऐकतही नाहीः पण हे प्रकार आता कुठेतरी थांबलेपाहिजेत व अशी बहुजन समाजाची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल थांबली पाहिजे. सुरुवात आपल्यापासून करणे हाच उपाय ठरतो. पण आपआपल्या कुटुंबात या विषयावर एकमत होईल तो दिवस सुगीचा ठरेल.
मोठ्या दृष्टीकोनाची गरज आहे
आपण सामान्य माणूस काय करू शकतो, विशेष माणसेच काय ते करू शकतील. पण मग समाजातील कालबाह्य व अर्थहीन रीती- रिवाज, प्रथा हे बंद करण्याकरिता खरेच कुण्या मोठ्या माणसाची गरज आहे का? ते आपण व्यक्तिगत बंद करू शकतो। जसे की, मोठे जास्त खर्चाचे लग्न आर्थिक तरतूद नसताना आपल्या कुटुंबात न करणे. भली मोठी तेरती न करणे. तेरतीचे कार्यक्रम बंद पड़ावे असे वाटते म्हणून, जवळचे नातेवाईक वगळता इतरांच्या तेरल्यांना उपस्थित न राहणे. मोठे मोठे वाढदिवसाचे कार्यक्रम न करता हा पैसा मुलांचे शिक्षण अन् भविष्यातील जबाबदारीसाठी बचतीत वळती करणे, जे स्वतः लाखो रुपये उधळून लग्न करतात त्यांचेकडे आहेर न करणे. लग्नात नम्रपणे अक्षता घेण्याला नकार देऊन, फुल पाकळ्या न मिळाल्यास मंडपात बसून राहणे पण अक्षदा न उधळणे, DJ असणाऱ्या कार्यक्रमातून निघून जाणे. नवरदेवात्त्या समोर वेळेचा अपव्यय करत भर उन्हात तासनतास नावणाच्या मंडळीत चुकून सहभागी न होणे. राजकारणाच्या नावावर स्वतःचे घर भरणाऱ्या भ्रष्ट नेते अन्त्यांच्या दलालापासून सावधानता बाळगणे, अशा प्रकारचे बदल करण्यासाठी मोठ्या माणसाची खरच गरजच काय? इथे तुमच्या मोठ्या दृष्टीकोनाची गरज आहे। स्वतः पासून सुरू करा कधी तरी समाज दखल घेईलच. कदाचित खूप दिवस लागतील इतकेच ! अंधानुकरण करणाऱ्या समाजात काही डोळस समाज पण असतोच.