Sangli Samachar

The Janshakti News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २१ जून २०२४
उत्पादन शुल्क धोरण प्रकरणामध्ये राऊस अव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्ज मंजूर केला आहे. केजरीवालांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने ४८ तासांचा वेळ मागितला आहे. 
शुक्रवारी कोर्टासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होतील. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिहार तुरुंगातून ते बाहेर येऊ शकतात, असे राऊस अव्हेन्यू कोर्टाने सांगितले. 


शुक्रवारी कोर्टासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होतील. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिहार तुरुंगातून ते बाहेर येऊ शकतात, असे राऊस अव्हेन्यू कोर्टाने सांगितले. ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली होती. परंतु कोर्टाने स्थगिती देणार नसल्याचं म्हटलं आहे.