| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० जून २०२४
माजी मंत्री आणि आमदार सध्या आपल्या जबरदस्त वक्तव्याने संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलेले आहेत. मग ते वक्तव्य उद्धव ठाकरे यांना उत्तरादाखल दिलेल्या 'वाघाचे' असो किंवा 'एका पाटलाला मी खासदार केलं आहे, आता दुसऱ्या पाटलाला आमदार करायचा आहे' हे उपस्थितांच्या टाळ्या मिळवणारं असो.
परंतु सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न साऱ्यांनाच चिंतेत पाडणारा आणि चिंतन करायला लावणारा आहे. सध्या महाराष्ट्र अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेवर पेटून उठला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात सापडलेले ड्रग्सचे साठे आणि त्याचा समाजासाठी चा घातक उपयोग हा गांभीर्याने चर्चा करण्याचा विषय आहे.
डॉ. विश्वजीत कदम यांनी आमदार झाल्यापासून प्रत्येक अधिवेशनात संवेदनशील आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर आवाज उठविला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर शासनाला कठोर पावलेही उचलावी लागली आहेत. डॉ. विश्वजीत कदम यांनी उपस्थित केलेला प्रश्न म्हणजे पुण्याला ड्रग्सचा पडलेला विळखा आणि त्यात अडकलेली तरुणाई. पुण्याच्या अस्मितेचा हा प्रश्न आणि व्यसनाधींच्या आहारी गेलेली नवी पिढी सध्या चिंतेचा विषय बनलेली आहे महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना, डॉ. विश्वजीत कदम यांनी सभागृहासमोर मांडली. ट्रकच्या अडून मुलींना फसवले जात असल्याचा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आता विधानसभेच्या तयारीला लागलेले महाराष्ट्र शासन यावर काय पावले उचलते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.