सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २६ जून २०२४
मिरज कृष्णा घाट मार्गावर नुकत्याच झालेल्या अपघातात एका पिकप व्हॅनने धडक दिल्याने चार वर्षाच्या बालकाचे निधन झालेल्या गोसावी कुटुंबीयांची सांगलीचे पालकमंत्री ना. सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन सांत्वन केले.
दोन दिवसापूर्वी मिरज कृष्णा घाट मार्गावर वेदांत विकास गोसावी या अपघातात जागीच ठार झाला होता, तर त्याची आजी सुनिता गोसावी या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघाताचे माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री ना. सुरेश भाऊ खाडे यांच्यासह सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या समवेत गोसावी कुटुंबीयांचे भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
रत्नागिरी नागपूर महामार्गावर भरधाव जाणारी वाहने ही अपघातास कारणीभूत ठरत आहेत, अशी माहिती यावेळी उपस्थित आणि येथील सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर करावेत अशी मागणी केली. तेव्हा या परिसरात आवश्यक तेथे तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्याचे आदेश ना. खाडे यांनी दिले.